देशाची पहिली बुलेट ट्रेन २०२६ मध्ये धावणार..! रेल्वेमंत्र्यांची ‘मोठी’ घोषणा; वाचा सविस्तर!

WhatsApp Group

Indias First Bullet Train : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी अहमदाबाद दौऱ्यावर असताना बुलेट ट्रेनबाबत मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, देशातील पहिली बुलेट ट्रेन ऑगस्ट २०२६ मध्ये धावणार आहे. सध्या याबाबत काम सुरू आहे. याशिवाय १९९ स्थानके जागतिक दर्जाची करण्यासाठी मास्टर प्लॅन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याअंतर्गत अहमदाबाद रेल्वे स्थानक जागतिक दर्जाचे बनवण्यात येणार आहे.

वंदे भारत एक्सप्रेस दुर्घटनेबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, ”देशातील सर्व रेल्वे रुळ अजूनही जमिनीवर आहेत. त्यामुळे गुरांचा प्रश्न कायम आहे. तथापि, अशा समस्यांना तोंड देण्यासाठी गाड्या तयार केल्या जात आहेत. कालच्या घटनेनंतरही वंदे भारत ट्रेनला काहीच झाले नाही. पुढचा भाग दुरुस्त केल्यानंतर पुन्हा गाडी सुरू झाली आहे.”

हेही वाचा – VIDEO : रोहित शर्माच्या ‘भिडू’नं ठोकला ११० मीटर लांब SIX..! सगळे अवाक्; पाहा…

वंदे भारत एक्सप्रेस रुळावर परतली

मुंबईहून गांधीनगरला जाणारी देशातील पहिली हाय-स्पीड ट्रेन वंदे भारत एक्सप्रेस गुरुवारी अहमदाबादच्या आधी बटवा आणि मणिनगर दरम्यान एका म्हशीला धडकली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रेनचा पुढील भाग तुटला होता. आता ही गाडी पूर्णपणे दुरुस्त करून पुन्हा रुळावर आणण्यात आली आहे. सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला. वंदे भारत एक्सप्रेस सध्या फक्त तीन मार्गांवर धावत आहे.

गुजरातमध्ये 5G लॅब बांधली जाणार

अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, गुजरातमध्ये 5G लॅब तयार केली जाईल. वैष्णव हे आयटी आणि दूरसंचार मंत्रीही आहेत. अलीकडेच त्यांनी इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये सांगितले होते की, देशात 5G तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या १०० लॅब सुरू करण्याची सरकारची योजना आहे. यापैकी किमान १२ प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि इतर प्रयोगशाळा नवीन प्रयोगांसाठी वापरल्या जातील.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment