Tata Tiago EV : सणासुदीच्या तयारीला नवीन चालना देत, टाटा मोटर्सने आज बुधवारी देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tiago EV लाँच केली. देशांतर्गत इलेक्ट्रिक कारच्या बाजारपेठेत टाटा मोटर्सचे आधीच वर्चस्व आहे आणि आता पहिले हॅचबॅक इलेक्ट्रिक वाहन लॉन्च केल्यामुळे कंपनीचे वर्चस्व आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. ग्राहकही टाटा टियागोच्या ईव्हीची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते.
टाटा मोटर्सने यापूर्वीच एसयूव्ही आणि सेडान श्रेणींमध्ये इलेक्ट्रिक वाहने लॉन्च केली आहेत. एसयूव्ही सेगमेंटमधील टाटा नेक्सॉन ईव्हीलाही चांगली पसंती मिळाली आहे आणि टाटा मोटर्सने ईव्ही मार्केटमध्ये वर्चस्व गाजवले आहे. कंपनीने काही काळापूर्वी सेडान श्रेणीमध्ये टाटा टिगोर ईव्ही सादर केली होती. आता हॅचबॅकमध्येही कंपनीने ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनाचा पर्याय दिला आहे.
Say hello to our 1st electric hatch- Tata Tiago.ev!
Introductory price starts at ₹ 8.49 Lakh* for the 1st 10,000 customers.
Out of the 10,000 customers, we have reserved 2000 only for our very own EV fam! 🫶🏻Register now: https://t.co/oTSY2DyZSi#Tiagoev #EvolveToElectric pic.twitter.com/hOF2gk3MpQ
— Tata Passenger Electric Mobility Limited (@Tatamotorsev) September 28, 2022
किंमत किती?
Tata Tiago EV ची सुरुवातीची किंमत ८.४९ लाख रुपये आहे. ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. या कारला एका चार्जमध्ये ३१५ किमीची रेंज मिळेल. त्याची बुकिंग १० ऑक्टोबर २०२२ पासून आणि वितरण जानेवारी २०२३ पासून होईल. टाटा टियागो ही ईव्ही सेगमेंटमधील भारताची पहिली प्रीमियम हॅचबॅक बनली आहे. DC फास्ट चार्जरसह Tiago बॅटरी ८०% पर्यंत चार्ज होण्यासाठी ५७ मिनिटे लागतील.
Wow what an amazing one tata
Tiago ev new world #TiagoEV pic.twitter.com/gsqWWEXw8V— Zombie (@Zombie1471) September 28, 2022
Tiago ला ८ स्पीकर सिस्टम, रेन सेन्सिंग वायपर, क्रूझ कंट्रोल, पुश बटन स्टार्ट/स्टॉप, इलेक्ट्रिक ORVM आणि बरेच काही मिळते. दाव्यानुसार, Tiago EV ही भारतातील सर्वात सुरक्षित इलेक्ट्रिक हॅचबॅक आहे. या EV वर १,६०,००० किमी पर्यंत बॅटरी आणि मोटर वॉरंटी उपलब्ध असेल.