प्रसिद्ध भारतीय YouTuber अपघातात ठार..! ट्रकनं बाईकला दिली धडक

WhatsApp Group

YouTuber Abhiyuday Mishra Accident : पचमढी येथे साहसी पर्यटनासाठी आलेल्या दुचाकीस्वाराचा अपघात झाला. पचमढीहून सोहागपूर मधईकडे जात असताना दुचाकी चालकाला ट्रकने धडक दिली. गंभीर अवस्थेत त्याला सोहागपूर रुग्णालयात नेण्यात आले, तेथून त्याला भोपाळला रेफर करण्यात आले, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी हा अपघात झाला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभ्युदय मिश्रा असे मृताचे नाव असून तो इंदूरचा रहिवासी आहे. घटनेनंतर सर्व दुचाकीस्वार हादरून गेले. मिळालेल्या माहितीनुसार, जगातील टूर रायडर्ससाठी बाईकर्स ग्रुप २१ सप्टेंबरला खजुराहोहून निघाले होते. रविवारी हा ग्रुप पचमढीला पोहोचला होता. पचमढीमध्ये अनेक ठिकाणी फिरून झाल्यावर सर्वजण मधईला जाणार होते. सोहागपूरजवळ MP ०९ HG ९११४ क्रमांकाच्या ट्रकच्या चालकाने दुचाकीला मागून धडक दिली. दुचाकी चालवत असलेले अभ्युदयचे वडील शिवानंद मिश्रा हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी रुग्णवाहिका बोलविण्यात आली, त्यानंतर जखमींना सोहागपूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना नर्मदापुरम जिल्हा रुग्णालयात आणि नंतर भोपाळला रेफर करण्यात आले. वाटेतच अभ्युदयचा मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – IND Vs SA 1st T20 : रोहित शर्मानं जिंकला टॉस; अशी आहे दोन्ही संघांची Playing 11

अभ्यूदय प्रसिद्ध युट्यूबर..

मूळच्या इंदौरच्या असलेल्या अभ्युदय मिश्राचे YouTube आणि Instagram वर अनुक्रमे १.४९ मिलियन आणि ४००+ हजार फॉलोअर्स होते. मध्य प्रदेश पर्यटन मंडळाने प्रायोजित केलेल्या ‘रायडर्स इन द वाइल्ड’ प्रवासात इतर बायकर्ससह अभ्युदय सहभागी झाला होता. २१ सप्टेंबर रोजी खजुराहो याठिकाणाहून हा प्रवास सुरू झाला होता, हा प्रवास चार व्याघ्र प्रकल्प आणि पर्यटन स्थळं असणाऱ्या खजुराहो, अमरकंटक, पानारपाणी आणि भोपाळदरम्यान होणार होता. जागतिक पर्यटन दिनाला (२७ सप्टेंबर) हा प्रवास संपणार होता, पण आदल्याच दिवशी अभ्युदयने जगाला अलविदा म्हटले.

Leave a comment