भारतीय रेल्वेतून दररोज लाखो लोक प्रवास करतात. लोकांचा प्रवास सुखकर करण्यासाठी रेल्वे सातत्याने आधुनिक सुविधा पुरवत असून या अंतर्गत वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन (Vande Bharat Express Cost) सुरू करण्यात आली, जी सामान्य गाड्यांपेक्षा खूपच वेगळी आहे. भारतीय रेल्वे आता एकामागून एक वंदे भारत ट्रेन चालवत आहे. ही ट्रेन तयार करण्यासाठी किती खर्च येतो हे तुम्हाला माहितीये का?
वंदे भारत ट्रेनमध्ये आतापर्यंत अनेक अपडेट्स करण्यात आले आहेत. अलीकडेच वंदे भारतच्या काही अपडेटेड गाड्या आल्या आहेत, ज्यात 16 डबे आहेत. 16 डब्यांची ही ट्रेन बनवण्यासाठी 115 कोटी रुपये खर्च आला आहे. म्हणजे एक ट्रेन तयार करण्यासाठी 115 कोटी रुपये खर्च येतो. पण असे मानले जाते की जेव्हा वंदे भारत ट्रेनकडून उत्पादन वाढेल तेव्हा हा खर्च कमी होऊ शकेल.
असा अंदाज आहे, की लवकरच 50 हून अधिक वंदे भारत ट्रेन धावतील, त्यानंतर त्याची किंमत आणखी कमी होईल. यापूर्वी एका ट्रेनची किंमतही 106 कोटी रुपये होती आणि काही ट्रेन बनवण्यासाठी 110 ते 115 कोटी रुपये खर्च आला होता.
हेही वाचा – WiFi राऊटरच्या पाठी अॅल्युमिनियम फॉइल ठेवल्याने इंटरनेट स्पीड वाढतो?
वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन तयार करण्यासाठी सुमारे 110 ते 120 कोटी रुपये खर्च आला आहे. वृत्तानुसार, इंटिग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई (ICF-Chennai) चे महाव्यवस्थापक AK अग्रवाल यांनी सांगितले की, 16 डब्यांची इंजिनरहित सेमी-हाय स्पीड वंदे भारत ट्रेन बनवण्यासाठी सुमारे 120 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर आपण भारतीय रेल्वेच्या सामान्य ट्रेनबद्दल बोललो तर 24 डब्यांची ट्रेन तयार करण्यासाठी सुमारे 66 कोटी रुपये खर्च येतो. साधारण ट्रेन इंजिन तयार करण्यासाठी सरासरी 18 कोटी रुपये खर्च येतो, तर एका डब्याची किंमत सुमारे 2 कोटी रुपये असते. त्यानुसार 24 डब्यांची ट्रेन बनवण्यासाठी सरासरी 66 कोटी रुपये खर्च करावे लागतात.
वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आतापर्यंत देशभरात 13 मार्गांवर सुरू झाली असून प्रत्येक मार्गावर वेगवेगळे भाडे आहे. त्यानुसार प्रत्येक ट्रेनची कमाई वेगवेगळी असू शकते. वृत्तानुसार, दिल्ली ते वाराणसी मार्गावर धावणारी वंदे भारत ट्रेन दरमहा सरासरी 7 कोटी रुपये कमवते. त्याचबरोबर या वर्षी फेब्रुवारीमध्ये सुरू झालेल्या मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस आणि मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. एका महिन्यात या मार्गावरून रेल्वेला 8.6 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!