

Indian Railways : तुम्हीही पुढच्या महिन्यात धार्मिक सहलीची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. रेल्वेने एक खास पॅकेज आणले आहे, ज्यामध्ये तुम्हाला अयोध्या ते जनकपूर प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. हा प्रवास रेल्वे भारत गौरव डिलक्स ट्रेनने होत आहे. या पॅकेजची खास गोष्ट म्हणजे तुम्हाला निवास आणि भोजनासह अनेक सुविधा मोफत मिळणार आहेत. यासाठी तुम्हाला एक रुपयाही वेगळा खर्च करावा लागणार नाही. IRCTC ने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे.
IRCTC चे ट्वीट
IRCTC ने आपल्या अधिकृत ट्वीटमध्ये लिहिले आहे की, रेल्वे तुम्हाला भगवान रामाशी संबंधित ठिकाणी घेऊन जात आहे. भारत गौरव डिलक्स एसी टुरिस्ट ट्रेनमधून तुम्हाला हे दर्शन दिले जाईल.
पॅकेज तपशील –
पॅकेजचे नाव – श्री राम जानकी यात्रा : अयोध्या ते जनकपूर
दौरा किती काळ चालेल – ६ रात्री / ७ दिवस
यात्रेची तारीख – १७ फेब्रुवारी २०२३
यात्रेचा कार्यक्रम
दिल्ली – अयोध्या – नंदीग्राम – जनकपूर – सीतामढी – वाराणसी – प्रयागराज – दिल्ली
Experience the beauty and serenity of places connected with Lord Rama with #irctc's SHRI RAM JANKI YATRA : AYODHYA TO JANAKPUR By Bharat Gaurav Deluxe AC Tourist Train. Grab the package at lowest prices at https://t.co/OLzhtKrb7D
— IRCTC (@IRCTCofficial) January 17, 2023
बोर्डिंग-डिबोर्डिंग पॉइंट
दिल्ली सफदरजंग – गाझियाबाद – अलीगढ – तुंडला – इटावा – कानपूर
हेही वाचा – Video : सरफराज खानचा हाहाकार..! मराठमोळा कोचही झाला खुश; शतक केल्यानंतर काय घडलं बघा!
AC-1 ची किंमत किती असेल?
या पॅकेजच्या किंमतीबद्दल सांगायचे तर, तुम्हाला AC-1 मध्ये ७२ जागा मिळतील, ज्याची किंमत सिंगल ऑक्युपन्सीसाठी प्रति व्यक्ती ५८४४० रुपये असेल. डबल ऑक्युपन्सीसाठी प्रति व्यक्ती ५२६५० रुपये मोजावे लागतील. तर ट्रिपल ऑक्युपन्सीसाठी प्रति व्यक्ती ५२६५० रुपये खर्च केले जातील.
AC-2 ची किंमत किती असेल?
AC-2 साठी ४८ जागा उपलब्ध आहेत, ज्यामध्ये तुम्हाला सिंगल ऑक्युपन्सीसाठी ४५०४० रुपये प्रति व्यक्ती खर्च करावे लागतील. . डबल ऑक्युपन्सीसाठी तुम्हाला प्रति व्यक्ती ३९७७५ रुपये खर्च करावे लागतील. तर, ट्रिपल ऑक्युपन्सीसाठी प्रति व्यक्ती ३९७७५ रुपये खर्च केले जातील.
मुलांचा प्रवासखर्च
५ ते ११ वर्षे वयोगटातील मुलांच्या प्रवासखर्चाबद्दल बोलायचे झाले तर AC-1 साठी ४९३१५ रुपये आणि AC-2 साठी ३५९७० रुपये मोजावे लागतील.
अधिकृत लिंक
या पॅकेजबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही अधिकृत लिंकला भेट देऊ शकता bit.ly/3GGIGdA येथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.