Indian Railways : ट्रेनचे तिकीट हरवले, फाटले, तर काय करायचे? जाणून घ्या ही माहिती!

WhatsApp Group

Indian Railways : कोणत्याही ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी, आपल्याकडे वैध तिकीट असणे आवश्यक आहे. केवळ ट्रेनमध्येच नाही तर रेल्वे प्लॅटफॉर्मवरही तुम्ही प्रवासाचे तिकीट किंवा प्लॅटफॉर्म तिकीटाशिवाय जाऊ शकत नाही. विना तिकीट रेल्वे प्लॅटफॉर्म किंवा ट्रेनमध्ये गेल्यास मोठा दंड आकारला जातो. अनेक वेळा असंही होतं की, एखादी व्यक्ती तिकीट घेते, पण तिकीट हरवते. ट्रेनचे तिकीट हरवल्याने प्रवाशांना खूप टेन्शन येते. प्रवासी गोंधळून जातो. नियमांची माहिती नसल्यामुळे, तो घरी तिकीट विसरला किंवा आरक्षण तिकीट हरवले तर त्याला ट्रेनमध्ये प्रवास करता येईल की नाही हे कळत नाही.

तसे, प्रवासादरम्यान रेल्वेचे तिकीट हरवले तर कोणत्याही प्रवाशाला फार काळजी करण्याची गरज नाही. तिकीट हरवले तर डुप्लिकेट तिकीट बनवून तुम्ही प्रवास करू शकता. डुप्लिकेट तिकिटे बनवण्याचे नियम आणि शुल्क वेगवेगळ्या वर्गांसाठी वेगवेगळे आहेत. प्रवासी ट्रेनमध्ये टीटीईकडे जाऊन डुप्लिकेट तिकीट बनवू शकतात. इतकेच नाही तर प्रवाशाला तिकीट काउंटरवर जाऊन डुप्लिकेट तिकीट मिळू शकते.

हेही वाचा – Rakshabandhan 2023 : रक्षाबंधन 30 की 31 ऑगस्टला? जाणून घ्या शुभ मुहूर्त!

भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, indianrail.gov.in, डुप्लिकेट तिकीट मिळविण्यासाठी तुम्हाला काही शुल्क द्यावे लागेल. सेकंड आणि स्लीपर क्लाससाठी डुप्लिकेट तिकीट बनवण्यासाठी 50 रुपये मोजावे लागतात. वरील श्रेणीसाठी डुप्लिकेट तिकिटे बनवण्यासाठी तुम्हाला 100 रुपये शुल्क द्यावे लागेल. आरक्षण चार्ट तयार केल्यानंतर जर कन्फर्म केलेले तिकीट हरवले असेल, तर तुम्हाला डुप्लिकेट तिकीट काढण्यासाठी भाड्याच्या 50% रक्कम भरावी लागेल. तुमचे हरवलेले मूळ तिकीट सापडल्यास, तुम्ही डुप्लिकेट तिकिटासाठी दिलेली दोन्ही तिकिटे ट्रेन सुटण्यापूर्वी रेल्वे काउंटरवर दाखवून परत मिळवू शकता

तिकीट फाटले तर काय करावे?

जर एखाद्या प्रवाशाचे तिकीट कन्फर्म झाल्यानंतर फाटले तर त्याला 25 टक्के भाडे भरल्यानंतरच डुप्लिकेट तिकीट मिळेल. परंतु येथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा आहे की प्रतीक्षा यादी असलेले फाटलेले तिकीट हरवले तर तुम्ही डुप्लिकेट तिकीट बनवू शकत नाही.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment