Indian Railways : रेल्वेने प्रवास करायचा झाल्यास तो आरामदायी मानला जातो. कारण त्याचा अनुभव कार किंवा बसपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. ट्रॅफिक जॅम नाही, एका जागी बसण्याची गरज नाही. प्रवासादरम्यान डब्यात फिरू शकता. जर तुम्ही स्लीपर क्लास किंवा AC-1, AC-2, AC-3 मध्ये आरक्षण केले असेल तर तुम्ही तुमच्या सीटवर आरामात झोपू शकता. AC मध्ये उशी आणि ब्लँकेटही मिळते. एक चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही.
आता अशा ट्रेनबद्दल बोलू ज्यात प्रवास करणे तुमच्यासाठी सोपे नाही. या ट्रेनमध्ये तुम्ही एकदा बसलात तर पुन्हा बसण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल की बसायचे की नाही बसायचे. तुमच्याकडे जाण्यासाठी कोणताही पर्याय शिल्लक नसला तरी तुम्ही या ट्रेनने जावे की नाही याचा विचार कराल. ही ट्रेन आहे. हावडा-अमृतसर मेल.
ही ट्रेन 6 राज्यांतून प्रवास करते. यामध्ये पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, यूपी, हरयाणा आणि पंजाबचा समावेश आहे. पश्चिम बंगालमधील हावडा येथून चालते आणि पंजाबमधील अमृतसरला पोहोचते. ही ट्रेन एकूण 2005 किलोमीटर अंतर कापते. हे अंतर कापण्यासाठी सुमारे 37 तास 30 मिनिटे लागतात. त्यानुसार, सरासरी वेग पाहिला तर तो 55 वर येतो. म्हणजे ही ट्रेन एका तासात केवळ 55 किलोमीटर अंतर कापते.
हेही वाचा – Electric-CNG विसरा..! आली सोलरवर चालणारी टाटाची कार; ३० रुपयात धावणार १०० किमी
अशा कमी सरासरी गतीमागे एक कारण आहे जे सर्वात महत्वाचे आहे. हावडाहून अमृतसरला जाण्यासाठी ही ट्रेन 50-100 नव्हे तर 111 ठिकाणी थांबते. मात्र, इतके थांबे असूनही ही गाडी योग्य वेळेवरच सुरू आहे.
ट्रेन हावडा येथून संध्याकाळी 7:15 वाजता सुटते आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 8:40 वाजता अमृतसरला पोहोचते. आणि ती अमृतसरहून संध्याकाळी 6.25 वाजता सुटते आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 7.30 वाजता पोहोचते. हावडा-अमृतसर मेलचा क्रमांक 13005 आहे. त्याच्या भाड्याबद्दल बोलायचे झाले तर, स्लीपरचे भाडे 735 रुपये आहे, तर थर्ड एसीचे भाडे 1950 रुपये, सेकंड एसी 2835 रुपये आणि फर्स्ट क्लास 4835 रुपये आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!