Indian Overseas Bank : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ओव्हरसीज बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. वास्तविक इंडियन ओव्हरसीज बँकेने मुदत ठेवींवरील (FD) व्याजदरात वाढ केली आहे. आरबीआयने रेपो रेट वाढवल्यानंतर बँका एफडीचे दर वाढवत आहेत.
बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नवीन दर १ जानेवारी २०२३ पासून लागू झाले आहेत. बँकेने २ कोटींपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बदलानंतर, बँकेने ७ ते ९० दिवसांच्या कालावधीत एफडी व्याजदर ७५ बीपीएस पर्यंत वाढवले आहेत.
हेही वाचा – Aadhaar Card : आधार कार्डधारकांसाठी मोठं अपडेट, आता मिळणार नाही सरकारी योजनांचा लाभ!
इंडियन ओव्हरसीज बँक एफडी दर
- ७ ते १४ दिवस – ४.५० %
- १५ ते २९ दिवस – ४.५० %
- ३० ते ४५ दिवस – ४.५० %
- ४६ ते ६० दिवस – ४.७५ %
- ६१ ते ९० दिवस – ४.७५ %
- ९१ ते १२० दिवस – ४.२० %
- १२१ ते १७९ दिवस – ४.२० %
- १८० ते २६९ दिवस – ४.८५ %
- २७० दिवस ते एका वर्षापेक्षा कमी ५.२५ %
- एक वर्ष < २ वर्षांपेक्षा कमी (४४४ दिवस सोडून) – ६.४० %
- ४४४ दिवस – ६.५५ %
- एक वर्ष ते < ३ वर्षांपेक्षा कमी – ६.४० %
- ३ वर्षे आणि त्याहून अधिक – ६.५० %
आरबीआयची यावर्षी रेपो दरात ५ वेळा वाढ
रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी रेपोमध्ये ५ वेळा वाढ केली होती. चलनवाढ कमी करण्याच्या उद्देशाने, मध्यवर्ती बँकेने ७ डिसेंबर २०२२ रोजी द्विमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर आणखी ०.३५ टक्क्यांनी वाढवून ६.२५ टक्क्यांवर नेला.