भारतीय नौदलाने विविध पदांच्या भरतीसाठी (Indian Navy Recruitment 2023 In Marathi) पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. नौदलाने 8 डिसेंबर रोजी भरतीबाबत अधिसूचना जारी केली होती. 10वी पास आणि ITI डिप्लोमा असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. 18 डिसेंबरपासून ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत. जर तुम्ही लष्करी क्षेत्रात नोकरीसाठी तयारी करत असाल, तर तुम्ही अर्ज करण्यास उशीर करू नये. कारण, अर्ज स्वीकारण्यासाठी आता शेवटचा आठवडा शिल्लक आहे.
भारतीय नौदलाने 18 डिसेंबर 2023 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत माहिती दिली आहे की त्यांनी 919 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. रिक्त पदांपैकी ट्रेडसमन मेट, वरिष्ठ ड्राफ्ट्समन आणि चार्जमन यासह विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
चार्जमन : 42
वरिष्ठ ड्राफ्ट्समन : 258
ट्रेड्समन मेट : 610
एकूण पदे : 910
अर्ज करण्याची शेवटची तारीख
नौदल भरती 2023 साठी पात्र अर्जदार joinIndiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज सबमिट करू शकतात. 18 डिसेंबरपासून अर्ज स्वीकारले जात आहेत आणि शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.
हेही वाचा – मातीविरहित शेती : बदलत्या काळाची गरज, जाणून घ्या कसं काम करतं हे तंत्र!
वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता
चार्जमन आणि ट्रेडसमन मेटसाठी : अर्जदाराची वयोमर्यादा 18-25 वर्षे असावी आणि वरिष्ठ ड्राफ्ट्समनसाठी 18-27 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता
चार्जमन : B.Sc किंवा संबंधित क्षेत्रात डिप्लोमा.
वरिष्ठ ड्राफ्ट्समन : आयटीआय किंवा संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा
ट्रेडसमन मेट : संबंधित क्षेत्रात 10वी पास + ITI
अर्ज शुल्क
भारतीय नौदल भरती 2023 मध्ये, सर्वसाधारण, OBC आणि EWS श्रेणीतील अर्जदारांसाठी अर्ज शुल्क 295 रुपये ठेवण्यात आले आहे. तर अर्ज महिला, माजी सैनिक, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी विनामूल्य आहे.
अर्ज कसा करावा?
- सर्व प्रथम तुम्हाला Indiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
- यानंतर तुम्हाला होमपेजवर रिक्रूटमेंट सेक्शन निवडावा लागेल.
- आता तुम्हाला इंडियन नेव्ही रिक्रूटमेंट 2023 निवडावी लागेल.
- तुम्ही इंडियन नेव्ही रिक्रूटमेंट 2023 ची अधिकृत सूचना काळजीपूर्वक वाचली पाहिजे.
- अर्जावरील प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक आणि अचूकपणे भरणे आवश्यक आहे.
- यानंतर तुम्हाला तुमची स्वाक्षरी, छायाचित्र आणि इतर कागदपत्रे जमा करावी लागतील.
- अर्जदाराला वर्गवारीनुसार अर्ज शुल्क भरावे लागेल.
- अर्ज पूर्णपणे तपासूनच सादर करावा लागेल.
- शेवटी तुम्हाला अर्ज प्रिंट करून सुरक्षितपणे ठेवावा लागेल.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!