जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश : चीन नव्हे भारत!

WhatsApp Group

India Overtakes China In Most Populous Nation : आता भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकले आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNFPA) च्या डेटावरून असे दिसून येते की भारताने चीनला मागे टाकून 142.86 कोटी लोकसंख्येसह जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. UNFPA नुसार चीनची लोकसंख्या 142.57 कोटी आहे. UNFPA च्या ‘द स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट, 2023 ने’, ‘8 बिलियन लाइव्स, इनफिनिट पॉसिबिलिटीज: द केस फॉर राइट्स एंड चॉइस’ हा अहवाल बुधवारी प्रसिद्ध केला.

अहवालातील ताजी आकडेवारी ‘डेमोग्राफिक इंडिकेटर्स’ या श्रेणीमध्ये देण्यात आली आहे. 1950 पासून जेव्हा संयुक्त राष्ट्रांनी लोकसंख्येचा डेटा गोळा करणे आणि प्रसिद्ध करणे सुरू केले तेव्हापासून भारताच्या लोकसंख्येने चीनला मागे टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हेही वाचा – IPL 2023 : आयपीएलमध्ये फिक्सिंग? RCB च्या ‘स्टार’ खेळाडूला ऑफर! फोनवर सांगितलं…

UNFPA च्या माध्यम सल्लागार अण्णा जेफरीज म्हणाल्या, ”खरेतर दोन्ही देशांची तुलना करणे खूप कठीण आहे. कारण दोन्ही देशांच्या डेटा कलेक्शनमध्ये थोडाफार फरक आहे. चीनची लोकसंख्या गेल्या वर्षी उच्चांकावर पोहोचली होती आणि आता ती कमी होऊ लागली आहे, हे या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर भारताची लोकसंख्या सध्या वाढत आहे. जरी भारताच्या लोकसंख्येच्या वाढीचा दर 1980 पासून घसरत आहे. याचाच अर्थ भारताची लोकसंख्या वाढत आहे पण तिचा दर आता पूर्वीच्या तुलनेत कमी झाला आहे.”

UNFPA च्या नवीन अहवालानुसार, भारतातील 25 टक्के लोकसंख्या 0 ते 14 वयोगटातील आहे, 18 टक्के लोक 10 ते 19 वयोगटातील आहेत, 26 टक्के 10 ते 24 वयोगटातील आहेत, 68 टक्के 15 ते 64 वर्षे वयोगट. आणि 65 वर्षांवरील 7 टक्के. चीनमध्ये 17 टक्के 0 ते 14 वर्षे, 12 टक्के 10 ते 19, 18 टक्के 10 ते 24 वर्षे, 69 टक्के 15 ते 64 वर्षे आणि 14 टक्के 65 वर्षांच्या दरम्यान आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment