Gaganyaan Mission | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पहिल्या मानवी अंतराळ उड्डाण गगनयान मोहिमेसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या चार अंतराळवीरांची नावे जाहीर केली आहे. पंतप्रधान मोदींनी तिरुअनंतपुरमजवळील थुंबा येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरला (VSSC) भेट दिली. त्यांनी सांगितले की प्रशांत बालकृष्णन नायर, अंगद प्रताप, अजित कृष्णन आणि शुभांशु शुक्ला हे गगनयान मोहिमेसाठी निवडलेले अंतराळवीर आहेत.
यादरम्यान पंतप्रधानांनी इस्रोच्या गगनयान मानव अंतराळ उड्डाण कार्यक्रमाचाही आढावा घेतला. याशिवाय भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या तीन मोठ्या अंतराळ पायाभूत सुविधा प्रकल्पांचेही त्यांनी उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये भारताच्या पहिल्या मानवयुक्त अंतराळ मोहिम गगनयानची घोषणा केली होत. तेव्हापासून संभाव्य अंतराळवीरांची नावे गोपनीय ठेवण्यात आली होती.
हेही वाचा – अमेरिकेत बंद होणार Google Pay..! कंपनीचा निर्णय
इस्रोने 21 फेब्रुवारीला माहिती दिली होती की, अंतराळवीरांना घेऊन जाणाऱ्या गगनयान मोहिमेच्या अंतिम चाचण्यांमध्ये ‘CE-20 क्रायोजेनिक इंजिन’ यशस्वी ठरले आहे. क्रायोजेनिक इंजिन गगनयान मानवयुक्त अंतराळ मोहिमेसाठी LVM प्रक्षेपण वाहनाच्या ‘क्रायोजेनिक स्टेज’ला सामर्थ्य देते. इस्रोने असेही म्हटले आहे, की गगनयान मोहिमेसाठी CE20 इंजिनच्या सर्व जमिनीवरील चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्या आहेत.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!