Independent India’s First Voter : स्वतंत्र भारताच्या पहिल्या मतदाराचं निधन; ‘या’ चित्रपटात दिसले होते

WhatsApp Group

Independent India’s First Voter Shyam Saran Negi Passes Away : भारताचे पहिले मतदार होण्याचा मान मिळवणारे किन्नर येथील श्याम सरन नेगी यांचे निधन झाले आहे. विशेष म्हणजे मृत्यूच्या दोन दिवस आधी ते हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी गेले होते. त्यांचे मतदान घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली होती. त्यांना रेड कार्पेटवर आणण्यात आले आणि संपूर्ण आदराने मतदान घेण्यात आले. जुने असल्याने मतदानाच्या तारखेपूर्वी मतदान पथक त्यांच्या घरी पोहोचले होते आणि पोस्टल बॅलेटद्वारे मतदान घेतले होते. श्याम सरन नेगी यांनी देशातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिले मतदान केले होते आणि तेव्हापासून त्यांनी कधीही मतदान करण्याची संधी सोडली नाही.

श्याम सरन नेगी १०६ वर्षांचे होते आणि त्यांनी कधीही मतदानाची संधी सोडली नाही. श्याम सरन नेगी यांनी हिमाचल प्रदेश निवडणुकीसाठी २ नोव्हेंबर रोजीच मतदान केले होते. ते काही दिवसांपासून आजारी होते. किन्नौरचे जिल्हाधिकारी आबिद हुसेन म्हणाले की, नेगी यांच्या अंत्यसंस्कारासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. त्यांना पूर्ण सन्मानाने निरोप देण्यात येणार असून त्यासाठी बँडचीही व्यवस्था करण्यात आली आहे. श्याम सरन नेगी यांचा जन्म १ जुलै १९१७ रोजी झाला. ते किन्नौरच्या कल्पामध्ये शिक्षक म्हणून काम करत होते.

हेही वाचा – Tulsi Vivah 2022 : कधी आहे तुळशी विवाह? वाचा तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व!

पहिले मतदार नेगी

भारतातील ब्रिटीश राजवट संपल्यानंतर १९५१ मध्ये जेव्हा पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या, तेव्हा श्याम सरन नेगी हे मतदान करणारे पहिले व्यक्ती होते. २५ ऑक्टोबर १९५१ रोजी रांगेत उभे असताना मतदान करणारे ते पहिले व्यक्ती होते. त्यानंतर फेब्रुवारी १९५२ मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या, पण हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीमुळे ५ महिने आधी मतदान झाले.

याचे कारण म्हणजे हिमाचलमध्ये फेब्रुवारीमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत असते आणि त्यामुळे मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचणे कठीण होते. हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीमुळे यावेळीही निवडणुका होत आहेत, तर गुजरातमध्ये डिसेंबरमध्ये मतदान होणार आहे. विशेष म्हणजे ‘सनम रे’ या चित्रपटात श्याम सरन नेगी देखील होते.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment