

Independence Day : आज संपूर्ण भारत स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहे. मात्र, तिरंग्याशिवाय स्वातंत्र्याचा उत्सव अपूर्ण आहे. जगातील प्रत्येक देशाचा स्वतःचा ध्वज असतो, जो त्यांची ओळख दर्शवतो. प्रत्येक देशाचा ध्वज तेथील लोकांच्या भावना, प्रतिष्ठा आणि गौरवशाली इतिहासाशी निगडीत आहे, ज्याचा लोकांना अभिमान आहे. पण तुम्हाला माहिती आहे का भारताच्या या राष्ट्रध्वजाची निर्मिती कशी आणि कोणी केली? आपला राष्ट्रध्वज कसा बनवला गेला. नसेल तर घ्या जाणून..
तिरंगा कुणी बनवला?
आंध्र प्रदेशच्या पिंगली व्यंकय्या यांनी हा तिरंगा बनवला होता. पिंगली व्यंकय्या यांचा जन्म २ ऑगस्ट १८७६ रोजी आंध्र प्रदेशातील मछलीपट्टनम येथील एका तेलुगू ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव हनुमंतरायुडू आणि आईचं नाव वेंकटरत्नम्मा होतं. अनेक भाषा आणि शेतीचे उत्तम ज्ञान असलेल्या व्यंकय्या यांनी आपलं आयुष्य देशसेवेत घालवलं. त्यांनी आपले शालेय शिक्षण मद्रास (आताचे चेन्नई) इथं पूर्ण केले आणि पदवीसाठी केंब्रिज विद्यापीठात गेले.
Our #Tiranga at the highest battlefield of the world #Siachen #HarGharTiranga #AzadiKaAmritMahotsav pic.twitter.com/qUDgOq7Mg7
— Baba Banaras™ (@RealBababanaras) August 14, 2022
रेल्वेत गार्डची नोकरी
तिथून परतल्यानंतर त्यांनी रेल्वेत गार्ड म्हणून काम केलं आणि नंतर लखनऊमध्ये सरकारी कर्मचारी म्हणून नियुक्ती झाली. पण काही काळानंतर पिंगली व्यंकय्या लाहोरमधील अँग्लो वैदिक विद्यापीठात उर्दू आणि जपानी भाषा शिकण्यासाठी गेले. भूगर्भशास्त्र आणि कृषी याशिवाय इतर अनेक क्षेत्रांतही त्यांनी ज्ञान संपादन केलं.
हेही वाचा – Independence Day : भारतावर राज्य करणाऱ्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’चा मालक आज एक भारतीय आहे!
ब्रिटिश सैन्यात जनरल
वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी पिंगली व्यंकय्या ब्रिटीश आर्मीमध्ये आर्मीमध्ये दाखल झाले. सैन्यात असताना दक्षिण आफ्रिकेतील अँग्लो-बोअर युद्धादरम्यान त्यांची महात्मा गांधींची भेट झाली. गांधीजींना भेटल्यानंतर ते इतके बदलले, की ते कायमचे भारतलाल आले. इतकंच नाही, तर ते आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रमुख सैनिक बनले. भारतासाठी स्वतःचा राष्ट्रध्वज असावा, असा सल्ला पिंगलींची महात्मा गांधींना दिला. त्यानंतर गांधीजींनी त्यांच्यावरच देशाचा ध्वज बनवण्याची जबाबदारी सोपवली.
पिंगली व्यंकय्या यांना कसा ध्वज हवा होता?
पिंगली यांना देशासाठी असा ध्वज बनवायचा होता जो देशाचा इतिहास प्रतिबिंबित करतो, त्याचा आत्मा प्रतिबिंबित करतो. त्यांनी १९१६ ते १९२१ या काळात जगातील अनेक देशांच्या राष्ट्रध्वजांचा अभ्यास केला. सुमारे पाच वर्षांनंतर, विजयवाडा येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) अधिवेशनात पिंगली व्यंकय्या यांनी महात्मा गांधींना लाल-हिरव्या ध्वजाची रचना दाखवली. ध्वजाचे दोन रंग होते – लाल आणि हिरवा. ते अनुक्रमे हिंदू आणि मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करत होते. इतर धर्मांसाठी, महात्मा गांधींनी त्यात पांढरा पट्टा समाविष्ट करण्याबद्दल सांगितलं. यासोबतच राष्ट्राच्या प्रगतीचे सूचक म्हणून चरखालाही त्यात स्थान मिळावं, असंही सुचवण्यात आलं.
This made my day@manojmuntashir #HarGharTiranga #Tiranga #TirangaYatra pic.twitter.com/0u07hFUF0u
— P. Siddharth (@sidpvishnu) August 13, 2022
हेही वाचा – Independence Day 2022 : डेव्हिड वॉनर्रचं ‘भारतप्रेम’ तर पाहा..! न विसरता केलं ‘अभिमानास्पद’ काम!
…आणि भारताला तिरंगा मिळाला
तब्बल दहा वर्षांनंतर १९३१ साली तिरंगा स्वीकारण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र, या प्रस्तावात काही दुरुस्त्याही करण्यात आल्या होत्या. उदाहरणार्थ, ध्वजावर लाल रंगाऐवजी भगवा रंग जोडण्यात आला. यासोबतच भगव्या, पांढर्या आणि हिरव्या रंगासह पांढऱ्या पट्टीवर फिरणारा देशाचा तिरंगा मिळाला. जुलै १९४७ मध्ये संविधान सभेत पिंगली व्यंकय्या यांनी बनवलेल्या तिरंग्याला राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आलं. काही काळानंतर तिरंग्यात सुधारणा करून चरख्याची जागा अशोक चक्रानं घेतली.
The Tiranga, true to its spirit, brings people together. #HarGharTiranga https://t.co/vCajlNT82a
— Narendra Modi (@narendramodi) August 14, 2022
देशाला तिरंगा देणारे महान स्वातंत्र्यसैनिक पिंगली व्यंकय्या वर्षानुवर्षे विस्मृतीत राहिले. १९६३ मध्ये विजयवाडा येथील झोपडीत त्यांचा मृत्यू झाला. पिंगली यांचे देशासाठीचं योगदान फार कमी लोकांना माहीत होतं. पण २००९ साली त्यांचा सन्मान करत भारतीय टपाल विभागानं त्यांच्या नावानं एक टपाल तिकीट जारी केले. त्यानंतर लोकांना त्याच्याबद्दल माहिती मिळाली. २०१४ मध्ये, ऑल इंडिया रेडिओच्या विजयवाडा स्टेशनचे नावही त्यांच्या नावावर ठेवण्यात आले होतं. गेल्या वर्षी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी भारतरत्नसाठी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता.