Independence Day 2022 : आज १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. लाल किल्ल्याच्या तटबंदीवर ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सांगितलं, की स्वातंत्र्याच्या इतक्या दशकांनंतर संपूर्ण जगाचा भारताकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून नवव्यांदा तिरंगा फडकवला. ध्वजारोहणाच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार, पंतप्रधान मोदी प्रथम राजघाटावर पोहोचले, जिथे त्यांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली, त्यानंतर राष्ट्रगीत झालं. यावेळी मोदी अनोख्या फेट्यामध्ये दिसले. वेगवेगळ्या प्रसंगी आपल्या पगडीमुळं चर्चेत असलेले मोदी यावेळी तिरंगा फेट्यामध्ये दिसले.
भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले –
- आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, गेल्या ७५ वर्षात जे देशासाठी जगले आणि मरण पावले, देशाचे रक्षक, ज्यांनी देशाचा संकल्प पूर्ण केला, मग ते लष्कराचे जवान असोत, पोलीस असोत, लोकप्रतिनिधी असोत, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रशासक असोत.
- आकांक्षी समाज ही कोणत्याही देशाची सर्वात मोठी संपत्ती असते. देशातील प्रत्येकाला गोष्टी बदलायच्या आहेत आणि बदल पाहायचा आहे. त्यांना हा बदल डोळ्यांसमोर पाहायचा असतो.
#WATCH PM Narendra Modi hoists the National Flag at Red Fort on the 76th Independence Day pic.twitter.com/VmOUDyf7Ho
— ANI (@ANI) August 15, 2022
- भारताच्या कानाकोपऱ्यात त्या सर्व महापुरुषांचं स्मरण करण्याचे प्रयत्न झाले, ज्यांना कोणत्या ना कोणत्या कारणानं इतिहासात स्थान मिळालं नाही किंवा ते विसरले गेले. आज देशानं अशा वीर, महापुरुष, बलिदान, सत्याग्रहींचा शोध घेतला, त्यांचं स्मरण केलं.
- अमृत महोत्सवादरम्यान देशाच्या कानाकोपऱ्यात देशवासियांनी लक्ष्यवेधी कार्यक्रम आयोजित केले. कदाचित इतिहासात एवढा मोठा, रुंद, दीर्घ सोहळा एकाच उद्देशानं साजरा केला गेला असेल. बहुधा ही पहिलीच घटना घडली असावी.
- २०१४ मध्ये देशातील जनतेनं मला जबाबदारी दिली. स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेली मी पहिली व्यक्ती होतो, ज्याला लाल किल्ल्यावरून लोकांना संबोधित करण्याची संधी मिळाली.
- देश कृतज्ञ आहे, मंगल पांडे, तात्या टोपे, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, अस्फाक उल्ला खान, राम प्रसाद बिस्मिल, आपल्या अशा असंख्य क्रांतिकारकांनी ब्रिटिश राजवटीचा पाया हादरवला.
- स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या आणि स्वातंत्र्यानंतर देशाची उभारणी करणाऱ्या अनेक महापुरुषांना आदरांजली वाहण्याची आज संधी आहे.
हेही वाचा – Independence Day : भारतावर राज्य करणाऱ्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’चा मालक आज एक भारतीय आहे!
- भारतातील असा एकही कोपरा नव्हता, असा काळ नव्हता, जेव्हा देशवासीयांनी शेकडो वर्षे गुलामगिरीविरुद्ध लढा दिला नाही, आपलं जीवन व्यतीत केलं नाही, यातना सहन केल्या नाहीत, बलिदान दिलं नाही. अशा प्रत्येक महापुरुषाला आणि बलिदानाला नतमस्तक होण्याची आज आपल्या सर्व देशवासियांसाठी संधी आहे.
- कोरोनाच्या काळात लस घ्यावी की नाही या संभ्रमात जग जगत होते. त्यावेळी आपल्या देशातील लोकांनी २०० कोटी डोस घेऊन आश्चर्यकारक काम केलं.
- स्वातंत्र्यानंतर इतक्या दशकांनंतर संपूर्ण जगाचा भारताकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. भारताच्या भूमीवर जगानं समस्यांवर उपाय शोधायला सुरुवात केली आहे. जगात हा बदल, जगाच्या विचारात झालेला हा बदल हा आपल्या ७५ वर्षांच्या प्रवासाचा परिणाम आहे.
#WATCH PM Narendra Modi calls for a decisive fight against corruption and 'Parivaarwaad' during his Independence Day speech #IndiaAt75 pic.twitter.com/5xvdSaz4wm
— ANI (@ANI) August 15, 2022
- नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ज्या पद्धतीनं बनवलं गेलं आहे, ज्या मंथनाने बनवलं गेलं आहे, ते विविध लोकांच्या विचारांच्या प्रवाहाचं संकलन करून बनवलं गेलं आहे. भारताचं शैक्षणिक धोरण मातीशी निगडीत बनलं आहे. आपण ज्या कौशल्यावर भर दिला आहे, ती अशी शक्ती आहे, जी आपल्याला गुलामगिरीतून मुक्त होण्याचं बळ देईल.
- देशासाठी पुढील २५ वर्षे खूप महत्त्वाची आहेत. येत्या २५ वर्षांसाठी आपल्याला आपली शक्ती, संकल्प आणि क्षमता ‘पंचप्राणा’वर केंद्रित करायची आहे.
‘पंचप्राण’ –
१. आता देश एका मोठ्या संकल्पानं चालेल आणि तो मोठा संकल्प म्हणजे ‘विकसित भारत’.
२. मनाच्या आत, कोणत्याही कोपऱ्यात गुलामगिरीची खूण सुद्धा असेल तर ती दूर करावी लागेल0
३. आपल्याला आपल्या वारशाचा अभिमान असायला हवा.
४. एकता आणि एकजुट असण्याची भावना.
५. नागरिकांचं कर्तव्य.