Sachin Tendulkar’s Statue In Marathi : वानखेडेवर भारत आणि श्रीलंका यांच्यात वर्ल्डकपचा 33वा सामना खेळवला गेला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी कमाल केलीच, पण अजून एका गोष्टीमुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. सामन्यापूर्वी क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. वानखेडेवर उभारण्यात आलेला हा पुतळाही प्रेक्षकांना पाहता आला. पण हा पुतळा नक्की सचिनचा की ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथचा? असा प्रश्नही समोर आला.
मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) सचिन तेंडुलकर स्टँडच्या शेजारी असलेल्या 1 नोव्हेंबर रोजी एका समारंभात सचिन तेंडुलकरच्या या भव्य पुतळ्याचे अनावरण केले होते. या पुतळ्यात सचिन लोफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह खेळताना दिसत आहे. मात्र, सचिनच्या पुतळ्यात बनवलेला चेहरा काही प्रमाणात स्टीव्ह स्मिथसारखाच असल्याचे नंतर चाहत्यांना आढळून आले. यावर चाहत्यांनी जोरदार कमेंट केल्या.
हेही वाचा – महाराष्ट्रातील आशा स्वयंसेविकांना खुशखबर, दिवाळीत मानधनवाढीसह ‘इतका’ बोनस!
49 वर्षे जुन्या वानखेडे स्टेडियममध्ये प्रथमच असा पुतळा बनवण्यात आला आहे. अहमदनगरचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी तो तयार केला आहे. पण पुतळ्याचे रुप सचिनच्या दिसण्याशी जुळत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी संताप व्यक्त केला. सचिनच्या या पुतळ्याबद्दल चाहत्यांनी खूप ट्रोल केले. चाहत्यांनी मीम्स आणि ट्विटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!