IND vs SL : विराट कोहलीचा हेलिकॉप्टर शॉट..! चेंडूला धाडलं सीमापार; पाहा Video

WhatsApp Group

Virat Kohli Helicopter Shot : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा जुनी लय मिळवली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याने दोन शतके झळकावली आणि सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. कोहलीची मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. भारतीय संघाने श्रीलंकेचा मालिकेत ३-० असा क्लीन स्वीप केला. रविवारी तिरुअनंतपुरममध्ये मालिकेतील तिसरा सामना खेळला गेला, ज्यामध्ये भारतीय संघाने ३१७ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीची फलंदाजीही पाहायला मिळाली. कोहलीने कारकिर्दीतील ४६वे शतक झळकावले.

हेलिकॉप्टर शॉट

या सामन्यात कोहलीने ११० चेंडूत नाबाद १६६ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ८ षटकार आणि १३ चौकार मारले. या खेळीदरम्यान कोहलीने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या शैलीत त्याचा हेलिकॉप्टर शॉटही मारला. हा शॉट इतका जोरात मारला गेला की चेंडू ९७ मीटर लांब गेला. कोहलीच्या या हेलिकॉप्टर शॉटचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कोहलीने आपल्या डावात ४४व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर हा शॉट मारला.

हेही वाचा – Petrol Diesel Price Today : वाहनात पेट्रोल-डिझेल भरण्यापूर्वी, वाचा तेलाच्या किमतीच्या प्रत्येक अपडेट

शतकानंतर कोहली आक्रमक

विराट कोहलीने जेव्हा धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट लगावला तेव्हा त्याने शतक पूर्ण केले होते. कोहली १०१ धावांवर खेळत असताना त्याच्या बॅटमधून हेलिकॉप्टर शॉट आला. शतकानंतर कोहली अधिक आक्रमक झाला. पुढच्या म्हणजेच ४५व्या षटकात कोहलीने चमिका करुणारत्नेला लागोपाठ दोन षटकार ठोकले. या मालिकेतील तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये कोहलीने सर्वाधिक २८३ धावा केल्या. यादरम्यान त्याने दोन शतके झळकावली. कोहलीची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद १६६ होती, जी त्याने मालिकेतील शेवटच्या एकदिवसीय सामन्यात केली होती.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment