सरफराज खानला टीम इंडियाच्या वनडे संघात घ्या, मांजरेकरांचे मत

WhatsApp Group

भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज यांनी नुकताच कसोटी पदार्पण करणारा फलंदाज सरफराज खानचा टीम इंडियाच्या एकदिवसीय संघात समावेश करण्याबाबत मत दिले आहे. मांजरेकर म्हणतात की, टीम इंडियामध्ये मधल्या फळीतील फलंदाज म्हणून सरफराज (Sanjay Manjrekar On Sarfaraz Khan) हा चांगला पर्याय असू शकतो. सरफराजने राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली. पदार्पणाच्या कसोटीच्या दोन्ही डावात त्याने शानदार अर्धशतके झळकावली.

राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात सरफराज खानने 66 चेंडूत 62 धावा केल्या. त्याने रवींद्र जडेजासोबत पाचव्या विकेटसाठी 71 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. उजव्या हाताचा फलंदाज सरफराज खानने दुसऱ्या डावात नाबाद 68 धावा केल्या. चौथ्या दिवशीच ही कसोटी जिंकून भारताने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा कसोटी सामना 23 फेब्रुवारीपासून रांची येथे खेळवला जाणार आहे.

सध्या समालोचकाच्या भूमिकेत असलेले संजय मांजरेकर यांनी राजकोट कसोटी सामना संपल्यानंतर काही तासांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर लिहिले, ”मला वाटते की 50 षटकांच्या क्रिकेटसाठी भारताला मधल्या फळीत चांगला पर्याय सापडला आहे. जो मधल्या टप्प्यात फलंदाजी करू शकतो आणि वर्तुळातील 5 क्षेत्ररक्षकांमध्ये क्षेत्ररक्षणातही योगदान देऊ शकतो. तो म्हणजे सरफराज खान.”

हेही वाचा – Petrol Diesel Price (19  February 2024) : आज पेट्रोल आणि डिझेलचे दर किती ? तुमच्या शहरातील नवीन इंधन दर जाणून घ्या

सरफराज खानला टीम इंडियात प्रवेश करण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. रणजी ट्रॉफीचा ब्रॅडमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरफराज खानने गेल्या तीन हंगामात रणजीमध्ये भरपूर धावा केल्या होत्या. तरीही त्याला संघात स्थान मिळत नव्हते. राजकोटमध्ये त्याला पदार्पणाची कसोटी कॅप देण्यात आली तेव्हा तो थोडा भावूक झाला. त्यांचे वडील नौशाद खान आणि त्यांची पत्नी रोमना जहूर देखील स्टेडियममध्ये उपस्थित होते ज्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. सरफराजला आता ही संधी सोडायची नाही.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment