एका तासात भारताची टॉप ऑर्डर उद्ध्वस्त, 24 वर्षाचा हसन महमूद गाजवतोय मैदान!

WhatsApp Group

IND vs BAN 1st Test 1st Test : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरू झाला. सामन्याची सुरुवात भारतासाठी फार काही करू शकली नाही. बांगलादेशचा गोलंदाज हसन महमूदने भारतीय टॉप ऑर्डरची भंबेरी उडवली. त्याने रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या दिग्गज फलंदाजांना काही मिनिटांतच बाद केले. आतापर्यंत त्याने चार बळी घेतले आहेत.

पहिल्या सामन्याची सुरुवात भारतासाठी काही खास झाली नाही. बांगलादेशचा गोलंदाज हसन महमूद भारतीय फलंदाजांसाठी अडचणीचा ठरला आहे. त्याने कर्णधार रोहित शर्माच्या रूपाने भारताला पहिला धक्का दिला. तो केवळ सहा धावा करू शकला आणि नजमुल हुसेन शांतोच्या हाती झेल देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. महमूदने आठव्या षटकात शुबमन गिलला (0) लिटन दासकरवी झेलबाद केले. यानंतर वेगवान गोलंदाजाने विराट कोहली (6) आणि ऋषभ पंत (39) यांना बाद केले.

कोण आहे हसन महमूद?

उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज हसन महमूदचा जन्म 1999 मध्ये लक्ष्मीपूरमध्ये झाला. त्याने याच वर्षी श्रीलंकेविरुद्ध बांगलादेशकडून कसोटी पदार्पण केले. आतापर्यंत झालेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये त्याने आपल्या मारक गोलंदाजीने छाप पाडली आहे. महमूद आज त्याच्या कारकिर्दीतील चौथा कसोटी सामना खेळत आहे. याआधी त्याने पाकिस्तानविरुद्ध धुमाकूळ घातला होता. गेल्या दोन सामन्यांमध्ये या युवा गोलंदाजाने एकूण आठ विकेट्स घेतल्या होत्या. रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने पाच विकेट्स घेतल्या. आता त्याची नजर भारतावर आहे.

हेही वाचा – सलीम खान यांना धमकी, बुरखा घातलेल्या महिलेने विचारले, “लॉरेन्स बिश्नोईला पाठवू का?”

हसन महमूदची कारकीर्द

जर आपण 24 वर्षीय गोलंदाजाच्या कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्याने आतापर्यंत खेळलेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये 3.62 च्या इकॉनॉमी रेटने 14 विकेट्स घेतल्या आहेत (यात भारताविरुद्ध घेतलेल्या चार विकेट्सचा समावेश नाही). त्याच वेळी, त्याने 22 एकदिवसीय आणि 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अनुक्रमे 30 आणि 18 विकेट घेतल्या आहेत. हसनची देशांतर्गत कारकीर्दही चमकदार राहिली आहे. त्याने 20 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 63 बळी घेतले. याशिवाय त्याने लिस्ट ए मध्ये खेळल्या गेलेल्या 66 सामन्यांमध्ये 86 विकेट घेतल्या. त्याचबरोबर त्याने 68 टी-20 सामन्यात 69 विकेट्स घेतल्या आहेत.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment