IND vs AUS 2nd ODI Suryakumar Yadav : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना इंदूरमध्ये खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियासाठी पॅट कमिन्सच्या जागी कर्णधार म्हणून निवड झालेल्या स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर या भारतीय फलंदाजांनी स्फोटक शतके झळकावून संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. त्यानंतर केएल राहुल, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनीही स्फोटक फलंदाजी केली. सूर्यकुमारने एकाच षटकात 4 षटकार ठोकले.
भारतीय संघ फलंदाजी करत असताना सूर्यकुमारने 45व्या षटकात ही कामगिरी केली. मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या कॅमेरून ग्रीनला सूर्याने फटके दिले. पहिल्या चार चेंडूवर सूर्याने आपल्या स्टाईलने षटकार ठोकले. पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर एक-एक धाव आली. ग्रीनला या षटकात 26 धावा पडल्या. सूर्यकुमार आणि ग्रीन दोघेही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतात.
हेही वाचा – ….फ्लाइटमध्ये भेटलेल्या चाहत्याशी धोनी 2 तास बोलतच राहिला!
दोन्ही संघांची Playing 11
भारत – शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिध कृष्णा.
ऑस्ट्रेलिया – डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, जोस इंग्लिश, अॅलेक्स कॅरी, कॅमेरुन ग्रीन, शॉन अॅबॉट, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड, स्पेन्सर जॉन्सन.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!