Income Tax Recruitment 2023 : इन्कम टॅक्समध्ये भरती..! १०वी पास उमेदवारांना संधी; जाणून घ्या माहिती!

WhatsApp Group

Income Tax Recruitment 2023 : आयकर विभागात सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक जबरदस्त संधी आली आहे. आयकर विभागात विविध पदांवर भरती केली जात आहे. या भरतीसाठी कोणतीही परीक्षा होणार नाही. विशेष म्हणजे १०वी पाससाठीही अर्ज करण्याची संधी आहे. अशा परिस्थितीत, संपूर्ण माहिती पाहिल्यानंतर, पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज सादर करावेत.

आयकर विभागांतर्गत तामिळनाडू आणि पुद्दुचेरी प्रदेशासाठी ही भरती केली जात आहे. याद्वारे आयकर निरीक्षक, कर सहाय्यक आणि मल्टी टास्किंग स्टाफची पदे भरली जाणार आहेत. एकूण ७२ पदांसाठी रिक्त जागा काढण्यात आल्या आहेत. ही भरती क्रीडा कोट्याअंतर्गत केली जात आहे.

कोण अर्ज करू शकतो?

आयकर निरीक्षक पदांसाठी पदवी उत्तीर्ण, कर सहाय्यक पदांसाठी ८ हजाप प्रति तास डेटा एंट्री गतीसह पदवी उत्तीर्ण आणि १०वी उत्तीर्ण उमेदवार मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी अर्ज करू शकतात. यासोबतच उमेदवाराची खेळाची विहित पात्रताही असावी.

हेही वाचा – PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी ‘मोठी’ बातमी..! मोदी सरकार देणार १५ लाख; जाणून घ्या सविस्तर!

पगार

आयकर पदांवर नोकरी मिळाल्यानंतर, उमेदवारांना रु.९३००-३४८०० पर्यंत मासिक वेतन दिले जाईल. तर कर सहाय्यक आणि MTS पदांसाठी दरमहा ५२००-२०२०० रुपये वेतन दिले जाईल.

कुठे अर्ज करायचा?

या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आणि भरतीची अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment