Success Story : IAS राज यादव, एका समोशामुळे मिळवली सरकारी नोकरी!

WhatsApp Group

Success Story In Marathi : एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल तर अपयश तुम्हाला हरवू शकत नाही. या विधानाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशचे आयएएस ऑफिसर राज कमल यादव. राज यांचे वडील किशोर यादव हे ग्रामीण बँकेत कामाला होते. राज लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते. लखनऊच्या सैनिक स्कूलमध्ये राज इयत्ता सातवीत दाखल झाले. प्रवेश परीक्षेत चांगले गुण मिळाल्याने त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. तेथून त्यांच्या मनात सैन्यात सेवा करण्याची इच्छा निर्माण झाली.

बारावीनंतर राज एनडीएची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाले होते, पण मुलाखतीत नापास झाले, यानंतर ते प्री-मेडिकल टेस्टमध्येही नापास झाले. ऑल इंडिया प्री-व्हेटर्नरी टेस्ट (एआयपीव्हीटी) मध्ये चांगली रँक आणि शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर त्यांनी मद्रास व्हेटर्नरी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

राज कमल यादव यांना सीडीएस म्हणजेच संयुक्त संरक्षण सेवेद्वारे सैन्यात भरती व्हायचे होते. मग त्यांच्या अभ्यासादरम्यान त्यांना कळले, की पशुवैद्यकीयद्वारे देखील R.V.C. (Remount Veterinary Corps) सैन्यात नोकरी मिळू शकते. या दोन्ही परीक्षांच्या तयारीसोबतच त्यांनी यूपीएससी परीक्षेवरही लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. त्यानंतर विद्यार्थी विनिमय कार्यक्रमांतर्गत विद्यापीठाने त्यांना अमेरिकेतील मिशिगन राज्य विद्यापीठात पाठवले.

हेही वाचा – Telangana : फ्रिज उघडताना 4 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू, नक्की काय घडलं? वाचा

अमेरिकेतील वास्तव्यादरम्यान त्यांना संशोधन आणि नोकरीच्या अनेक ऑफर मिळाल्या. पण देशाची सेवा करण्याचे त्यांचे स्वप्न त्यांना भारतात परत आणले. त्यानंतर गुरुग्राममधील रुग्णालयात पशुवैद्यकीय डॉक्टर म्हणून रात्रीची ड्युटी करू लागले आणि दिवसा यूपीएससीची तयारी करू लागले. दरम्यान, त्यांची आयसीआर ज्युनियर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ) मध्ये निवड झाली. 2013 मध्ये, त्यांनी केवळ स्व-अभ्यासातून 21 वा क्रमांक मिळवून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि डॉक्टरमधून ते आयएएस अधिकारी बनले.

राज कमल यादव यांनी त्यांच्या UPSC मुलाखतीचा अनेक वेळा उल्लेख केला आहे, की त्यांचा अनुभव अप्रतिम होता. मुलाखतीच्या पॅनलमध्ये बसलेल्या टीमने समोसे खाताना त्यांना विचारले की आजाराचे सर्वात मोठे कारण काय आहे? समोशाकडे बोट दाखवत राज कमल म्हणाले, तुम्ही लोक जे खात आहात तो आजार आहे. जेव्हा राज यांना तिथे समोसा ऑफर करण्यात आला तेव्हा, त्यांनी नम्रपणे असे सांगून नकार दिला, की आपण आजार खाऊ शकत नाही.

आयएएस आणि आर्मी यापैकी कोणाला प्राधान्य देणार, असा त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आर्मीची निवड केली. राज कमल यादव यांच्या पत्नी उत्तर प्रदेश प्रशासकीय सेवेत अधिकारी आहेत. अभ्यासासोबतच राज यांना क्रिकेट, बॉडीबिल्डिंग आणि फुटबॉलचीही आवड आहे. 2021 मध्ये लॉकडाऊन दरम्यान त्यांनी सीएम आदित्यनाथ योगी यांच्यासोबत आयुष कवच अॅप तयार केले होते.

राज कमल यादव यांची 2014 मध्ये दक्षिण सिक्कीम जिल्ह्यात नियुक्ती करण्यात आली होती. त्या काळात जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शाळा, वीज-पाण्याचा अनियमित पुरवठा, विकास आदी समस्या भेडसावत होत्या. त्यांनी ‘जिल्हा प्रशासनाचे दत्तक गाव’ (DAAV) उपक्रम सुरू केला. या मॉडेल अंतर्गत, जिल्हा प्रशासन अविकसित गाव दत्तक घेते आणि त्याच्या विकासाची थेट जबाबदारी घेते. त्यामुळे साडेसात हजार लोकांना चांगले जीवन मिळाले.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment