IAF Agniveer Recruitment 2023 Registration : भारतीय हवाई दलात अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरवायू भरती ०२/२०२३ साठी ऑनलाइन नोंदणी १७ मार्चपासून सुरू झाली. हवाई दलाचे कमांडिंग ऑफिसर अभिषेक सिंग यांनी सांगितले की, अग्निवीर हवाई भरतीसाठी इच्छुक असलेल्या अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवारांना भारतीय हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइट https://agnipathvayu.cdac.in वरून भरतीशी संबंधित सर्व नियमांची तपशीलवार माहिती मिळू शकते.
त्यांनी सांगितले की अग्निवीरवायूच्या भरतीसाठी उमेदवार https://agnipathvayu.cdac.in वर लॉग इन करून 17 मार्च, सकाळी 10 ते 31 मार्च, संध्याकाळी 5 या वेळेत ऑनलाइन नोंदणी करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
१२वी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा विज्ञान शाखेतील गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयांसह आणि कला आणि वाणिज्य शाखेतील कोणत्याही विषयात 50 टक्के गुण, इंग्रजी विषयात किमान 50 टक्के गुणांसह किंवा 03 वर्षांचा अभियांत्रिकी पदविकाधारक किंवा 02 वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
हेही वाचा – Banking : एक मिस्ड कॉल देऊन चेक करा SBI चा अकाऊंट बॅलन्स..! ‘हा’ आहे नंबर
वय श्रेणी
हवाई दलाच्या कमांडिंग ऑफिसरने सांगितले की 26 डिसेंबर 2002 ते 26 जून 2006 दरम्यान जन्मलेले अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवार (दोन्ही तारखांसह) या भरतीसाठी पात्र असतील.
निवड प्रक्रिया
पात्र अर्जदारांना प्रथम 20 मे 2023 रोजी होणार्या ऑनलाइन लेखी परीक्षेत बसावे लागेल. यानंतर शारीरिक तंदुरुस्ती चाचणी (PFT) आणि वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. अर्ज करण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
भारतीय हवाई दल अग्निवीर वायु भरती 2023 अधिसूचना
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!