PM Modi In Telangana : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी तेलंगणा दौऱ्यावर आहेत. यावेळी जनतेला संबोधित करताना त्यांनी तेलंगणा सरकारवर ताशेरे ओढले. ते म्हणाले, ”लोक मला विचारतात की कष्ट करूनही मी थकत का नाही? मी रोज २-३ किलो शिव्या खातो म्हणून थकत नाही. देवाच्या आशीर्वादाने, मला दिलेल्या शिव्या पोषणात बदलतात.”
पंतप्रधान मोदींनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे नाव न घेता टीका केली. राव यांनी भ्रष्टाचार आणि परिवारवादाचे राजकारण केले, असे मोदींचे मत होते. ते म्हणाले, ”राज्याला ‘परिवार नव्हे, प्रथम जनतेचे’ सरकार हवे आहे. तुम्ही मोदींना शिव्या दिल्या, भाजपला शिव्या दिल्या, पण तेलंगणातील जनतेला शिव्या दिल्यास, तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल.”
हेही वाचा – IND Vs NZ : टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना..! चहलच्या बायकोनं शेअर केला फोटो
पंतप्रधानांचे कार्यकर्त्यांना आवाहन
मोदी म्हणाले, ”मला तेलंगणातील कामगारांसाठी वैयक्तिक प्रार्थना करायची आहे. काही लोक निराशा, भीती आणि अंधश्रद्धेतून मोदींविरुद्ध अनेक शिव्या वापरतील. त्यांच्या फसवणुकीने दिशाभूल होऊ नये म्हणून मी प्रार्थना करतो. केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीत राज्य सरकार जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करत आहे.”
బీజేపీ కార్యకర్తలకు నా విజ్ఞప్తి pic.twitter.com/tSLDabkj7K
— Narendra Modi (@narendramodi) November 12, 2022
सरकारच्या अंधश्रद्धेवर टोला
पीएम मोदींनी राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी अंधश्रद्धेवरही सडकून टीका केली. सर्व महत्त्वाचे निर्णय, कुठे राहायचे, कार्यालय कुठे आहे, कोणाला मंत्री करायचे, सर्व काही अंधश्रद्धेच्या धर्तीवर घेतले जात असल्याचा दावा त्यांनी केला. सामाजिक न्यायातील हा सर्वात मोठा अडथळा आहे. तेलंगणा हे माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र आहे. पण, या आधुनिक शहरात अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात आहे, हे खेदजनक आहे. तेलंगणाचा विकास करायचा असेल, मागासलेपणा दूर करायचा असेल, तर सर्वात आधी इथून अंधश्रद्धा दूर कराव्या लागतील.