23 नव्या फीचर्ससह Hyundai ने लाँच केली नवीन SUV कार, ‘एवढी’ किंमत!

WhatsApp Group

Hyundai Motor India Limited (HMIL) कंपनीने आज त्यांच्या प्रसिद्ध कॉम्पॅक्ट SUV Hyundai Venue चे नवीन नाईट एडिशन देशांतर्गत बाजारात लाँच केले आहे. कंपनीने या स्पेशल एडिशन SUV ला काही नवीन फीचर्सची जोड देऊन अपडेट केले आहे, ज्यामुळे ते नेहमीच्या मॉडेलपेक्षा अधिक आकर्षक बनले आहे. यापूर्वी, कंपनीने अलीकडेच Creta आणि Alcazar Adventure Edition लाँच केले होते. क्रेटाची नाईट एडिशन आधीच विक्रीसाठी उपलब्ध आहे. व्हेन्यू नाईट एडिशनची सुरुवातीची किंमत 10 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.

ह्युंदाई व्हेन्यू नाईट एडिशन ग्राहकांच्या विविध श्रेणीनुसार एकूण 7 व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आली आहे. त्याच्या बेस मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरिएंटची किंमत 9.99 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. कंपनीने हे दोन पेट्रोल इंजिन व्हेरिएंटसह सादर केले आहे, ज्यामध्ये 1.2 लीटर कप्पा पेट्रोल आणि 1.0 लीटर GDI पेट्रोल इंजिनचा पर्याय उपलब्ध आहे. त्याच्या टॉप ड्युअल टोन DCT व्हेरिएंटची किंमत 13.48 लाख रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे.

हेही वाचा – Horoscope Today : मंगळ-शुक्र ग्रह बदल; मिथुन आणि सिंह राशींना फायदा, जाणून घ्या कोणत्या राशीवर काय परिणाम

व्हेन्यू नाईट एडिशनचे व्हेरिएंट आणि किंमत

1.2 l Kappa Petrol

व्हेरिएंट आणि किंमत (एक्स-शोरूम)

S(O) Knight MT – रु. 9,99,990
SX Knight MT – रु. 11,25,700
SX Knight MT Dual Tone – रु. 11,40,700

1.0 l T-GDi पेट्रोल

SX(O) Knight MT – रु. 12,65,100
SX(O) Knight MT Dual Tone – रु. 12,80,100
SX(O) Knight DCT – रु. 13,33,100
SX(O) Knight DCT Dual Tone – रु. 13,48,100

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment