चीनच्या बीजिंगला मागे टाकून मुंबई बनली आशियातील अब्जाधीशांची राजधानी!

WhatsApp Group

Hurun Rich List 2024 : मायानगरी मुंबईला पुन्हा एकदा राजधानीचा मुकूट मिळाला आहे. मुंबईने चीनच्या राजधानी बीजिंगला हरवून आशियातील अब्जाधीश राजधानीचा किताब पटकावला आहे. अब्जाधीशांचे शहर म्हणून मुंबई आशियातील नंबर 1 बनली आहे. जगात मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. चीनच्या बीजिंग शहराला मागे टाकत मुंबई प्रथमच आशियातील अब्जाधीशांची राजधानी बनली आहे. हुरूनच्या यादीनुसार आशियातील अब्जाधीशांच्या शहरांमध्ये मुंबई पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे.

या यादीनुसार मुंबईने चीनची राजकीय आणि सांस्कृतिक राजधानी बीजिंगला हरवून हे विजेतेपद पटकावले आहे. बीजिंगमध्ये एका वर्षात 18 अब्जाधीश आता करोडपती झाले आहेत. हे लोक अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. बीजिंगमध्ये 91 अब्जाधीश शिल्लक आहेत. तर भारताची आर्थिक राजधानी मुंबईत 92 अब्जाधीश आहेत. चीनचे बीजिंग आशियामध्ये दुसऱ्या आणि जगात चौथ्या स्थानावर पोहोचले आहे. हुरून रिसर्चच्या 2024 च्या ग्लोबल रिच लिस्टनुसार, चीनमध्ये 814 अब्जाधीश आहेत, परंतु बीजिंगमध्ये फक्त 91 उरले आहेत, तर मुंबईत 92 अब्जाधीश आहेत.

मुंबईत राहणाऱ्या अब्जाधीशांची संपत्ती 445 अब्ज डॉलर्स आहे. जे गतवर्षीच्या तुलनेत 47 टक्के अधिक आहे. तर बीजिंगमधील अब्जाधीशांची संपत्ती 265 अब्ज डॉलर्स आहे. जे गतवर्षीच्या तुलनेत 28 टक्के कमी आहे. अब्जाधीशांच्या बाबतीत न्यूयॉर्कनंतर मुंबईचा जगात तिसरा क्रमांक लागतो. न्यूयॉर्कमध्ये 119 अब्जाधीश राहतात. यानंतर 97 अब्जाधीशांसह लंडन दुसऱ्या तर 92 अब्जाधीशांसह मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा – म्युच्युअल फंड : SIP मध्ये जास्त नफा हवा असेल, तर या 4 गोष्टी लक्षात घ्या, नुकसान होणार नाही!

मुंबईतील अब्जाधीशांमध्ये ऊर्जा आणि औषधी व्यावसायिकांचा समावेश आहे. यामध्ये मुकेश अंबानींसारख्या अब्जाधीशांच्या नावाचा समावेश आहे. अंबानींव्यतिरिक्त, रिअल इस्टेट प्लेयर मंगल प्रभात लोढा यांचा मुंबईतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अब्जाधीशांमध्ये समावेश आहे. मुंबईत एका वर्षात 26 नवीन अब्जाधीशांची भर पडली. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. गौतम अदानी, एचसीएलचे शिव नाडर, सीरम इन्स्टिट्यूटचे सायरस एस पूनावाला, सन फार्मास्युटिकल्सचे दिलीप सांघवी, कुमार मंगलम बिर्ला, डीमार्टचे राधाकिशन दमानी अशा अनेक नावांचा समावेश आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment