

PAN Aadhaar Link : आयकर भरणाऱ्यांचे पॅन कार्ड आधारशी लिंक नसल्यास ते आयटीआर दाखल करू शकणार नाहीत, असे सरकारने म्हटले आहे. याची अंतिम तारीख निघून गेली आहे आणि ३१ मार्च २०२३ पर्यंत लोक त्यांना दंडासह लिंक करू शकतात. पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी १००० रुपये दंड भरावा लागेल. आधार कार्डसोबत पॅन लिंक केले नसल्यास, केवळ आयटीआर भरणेच थांबेल असे नाही तर तुम्ही पॅन कार्डशी संबंधित इतर सुविधांचा लाभही घेऊ शकणार नाही. त्यामुळेच नागरिकांनी लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.
बहुतेक लोकांनी हे काम पूर्ण केले असले तरी अनेकांना त्यांचे आधार-पॅन लिंक झाले आहे की नाही हे माहीत नाही. हे देखील अगदी सहजपणे शोधले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला आयकर विभागाच्या वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर तुम्ही ‘Link Aadhaar Status’ वर क्लिक करा. तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल. यामध्ये तुम्हाला View Link Aadhaar Status वर क्लिक करावे लागेल. तुमच्या समोर एक मेसेज येईल. यावरून तुम्हाला कळेल की तुमचा आधार आणि पॅन लिंक आहे की नाही.
हेही वाचा – ATM कार्डशिवायही एटीएम मशीनमधून काढता येतात पैसे..! तुम्हाला माहितीये?
आधार-पॅन लिंक करण्याच्या सोप्या स्टेप्स –
- सर्व प्रथम incometax.gov.in वर जा.
- शोधा आणि ‘Link Aadhaar Status’ या पर्यायावर क्लिक करा.
- समोर उघडणाऱ्या नवीन विंडोमध्ये View Link Aadhaar Status वर क्लिक करा.
- जर आधार-पॅन लिंक असेल तर तुम्हाला एक संदेश दिसेल.
- जर आधार आणि पॅन लिंक नसेल तर तुम्ही ते इथेही लिंक करू शकता.
आधार आणि पॅन लिंक कसे करावे?
- सर्वप्रथम आयकर वेबसाइटवर जा ज्याचा पत्ता वर दिला आहे.
- यानंतर ‘link Aadhar’ वर क्लिक करा.
- येथे तुम्हाला लॉगिन करण्यास सांगितले जाईल.
- त्यात तुमची जन्मतारीख पॅन क्रमांक आणि यूजर आयडी सोबत टाका.
- आधार कार्डावर छापल्याप्रमाणे जन्मतारीख टाका.
- यानंतर तुमच्या खात्याच्या प्रोफाइल सेटिंगमध्ये जा.
- येथे आधार कार्ड लिंक पर्यायावर क्लिक करा.
- आता आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका.
- तुम्हाला खाली आधार लिंकचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
- यानंतर तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले जाईल.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!