मुंबई : विमानाच्या उत्क्रांतीपासूनचा टप्पा आपल्याला माहीत आहे. आता विमानसेवेत अधिक बदल झाले आहेत. नव्या यंत्रणांमुळं किंवा इतर काही गोष्टींमुळं त्यात काही त्रुटीही आहेत. भारतासह जगभरात, फ्लाइट कॅन्सल किंवा उशिरा होण्याच्या समस्या आहेतय. भारतातील इंडिगो आणि स्पाइसजेटची शेकडो उड्डाणे एकतर रद्द करण्यात आली किंवा अनेक डिले करण्यात आली आहेत. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेबरोबरच दोन्ही कंपन्या तांत्रिक अडचणींशी झगडत आहेत.
मनीकंट्रोलच्या म्हणण्यानुसार, ऑगस्टमध्ये जगभरात २५,००० नियोजित उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये १५,७८८ उड्डाणं केवळ युरोपमधील आहेत. ब्रिटिश एअरवेजने एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान नियोजित सुमारे ३०,००० उड्डाणं रद्द केली, तर तुर्की एअरलाइन्सने गेल्या आठवड्यात ४४०८ उड्डाणं रद्द केली. जेव्हा फ्लाइट रद्द होते, तेव्हा प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचणे तर कठीण होतेच, शिवाय पैसे परत मिळण्यासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते. अशा परिस्थितीत, आपल्याला लगेच रिफंड मिळावा, यासाठी आपल्याला काही टिप्स माहीत असल्या पाहिजेत.
तुम्ही कोणत्या प्रकारच तिकीट खरेदी केले आहे
झिरो कॅन्सलेशन : जर तुम्ही या प्रकारचं तिकीट खरेदी करताना तिकीट कॅन्सल केलं, तर एअरलाइन्स तुमचे पैसे खूप कमी सर्व्हिस चार्जने परत करतात. यात कोणत्याही अतिरिक्त खर्चाचा समावेश नाही.
फ्लेक्सी भाडे : या प्रकारच्या तिकिटाशी संबंधित अनेक सोयी आहेत. अशा तिकिटावर तुम्ही कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता प्रवासाची तारीख बदलू शकता, तुम्हाला पे लेटरचा पर्यायही मिळेल, रद्द केल्यावर परतावा सहज मिळेल.
रिफंडेबल : अशा टिकवर, एअरलाइन्स तुम्हाला फक्त मूळ भाडं परत करतील तर त्याच्याशी संबंधित इतर शुल्क ग्राहकांना परत केलं जाणार नाहीत.
थेट एअरलाइनवरून तिकीट बुक करा
प्रवाशांनी त्यांची तिकिटे थेट एअरलाइनवरून बुक करावीत. अनेक विमान कंपन्या शून्य रद्द तिकीट देतात. तुम्ही थर्ड पार्टी साइटवरून तिकीट बुक केल्यास तुम्हाला सेवा शुल्कासह इतर शुल्क भरावं लागतील आणि तिकीट रद्द केल्यावर तुम्हाला परतावा मिळणार नाही. काही एअरलाइन्स तिकीट रद्द करताना तुम्हाला रीबुकिंग करण्यास सांगतात, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पुढच्या तारखेला प्रवास करू शकता.
फ्लाइट रद्द किंवा उशीर झाल्यास तुमचे अधिकार काय आहेत?
consumerhelpline.gov.in नुसार, तिकीट बुक करताना एअरलाइन स्पष्ट करते की किती परतावा दिला जाईल. जर एखाद्या प्रवाशानं ओव्हरबुकिंगमुळं फ्लाइटमध्ये चढण्यास नकार दिला तर एअरलाइन त्याला भरपाई देणार नाही. मूळ फ्लाइटच्या उड्डाणाच्या वेळेपासून एका तासाच्या आत प्रवाशाला दुसऱ्या फ्लाइटमध्ये चढण्यास सांगितलं तर असं होईल.
विमान कंपनीनं फ्लाइटच्या २४ तास आधी प्रवाशांना कळवलं नाही आणि फ्लाइट रद्द केल्यामुळं कनेक्टिंग फ्लाइट सापडली नाही, तर एअरलाइनला नुकसान भरपाई द्यावी लागेल.
जर एखाद्या फ्लाइटला ६ तासांपेक्षा जास्त उशीर झाला असेल तर, विमान कंपनीनं प्रवाश्यांना त्याबद्दलची माहिती मूळ फ्लाइटच्या वेळेपासून २४ तासांच्या आत रीशेड्युल करण्यासाठी द्यावी लागेल. तसेच, एअरलाइनला प्रवाशांना हे पर्यायी फ्लाइट घेण्याबाबत किंवा पूर्ण परतावा मिळण्याबाबत विचारावं लागेल.
जर विमान कंपनीनं प्रवाशाला फ्लाइट रद्द झाल्याची माहिती फ्लाइटच्या २४ तास आधी दिली असेल, तर अशा परिस्थितीत ग्राहकाला दोन पर्याय दिले जाऊ शकतात. यामध्ये तिकिटाचा पूर्ण परतावा किंवा पर्यायी विमान प्रवासाचा पर्याय असेल.
जर एअरलाइननं प्रवाशांना २४ तास आधी फ्लाइट रद्द झाल्याची माहिती दिली नाही, ज्यामुळं कनेक्टिंग फ्लाइट चुकली, तर कंपनीला नुकसान भरपाई म्हणून ५-१० हजार रुपये द्यावे लागतील.
राजकीय अस्थिरता, नैसर्गिक आपत्ती, दंगली, पूर, सरकारी नियम, हवामान बिघाड किंवा सुरक्षेच्या जोखमीमुळं फ्लाइटला उशीर झाल्यास किंवा रद्द झाल्यास कंपनी कोणतीही भरपाई देणार नाही.
प्रवाशानं तिकीट रद्द केल्यास, विमान कंपनीला कर, विकास आणि प्रवासी सेवा शुल्क देखील परतावा म्हणून परत करावा लागेल. परदेशी उड्डाणांच्या बाबतीत, ते एअरलाइनच्या धोरणावर अवलंबून असेल.