आजही तुमच्याकडे 2000 च्या नोटा असतील, तर त्या परत कशा कराल?

WhatsApp Group

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने 2000 नोटांबाबत महत्त्वाची माहिती लोकांसमोर आणली आहे. 19 मे 2023 पर्यंत चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या नोटांपैकी 97.26 टक्के नोटा बँकिंग सिस्टममध्ये परत आल्या (Rs 2000 Notes Exchange) आहेत. 19 मे पर्यंत 3.56 लाख कोटी रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटा चलनात होत्या. 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत, 9,760 कोटी रुपयांच्या फक्त 2000 रुपयांच्या नोटा चलनात उरल्या आहेत, असे RBI ने सांगितले.

19 मे 2023 रोजी 2000 रुपयांची नोट चलनातून काढून टाकण्याची घोषणा करण्यात आली होती. मध्यवर्ती बँकेने यामागे क्लीन नोट पॉलिसीचा हवाला दिला होता. मात्र, 2000 रुपयांची नोट अवैध ठरली नाही. यानंतर 2000 रुपयांच्या नोटा परत करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी सुमारे 4 महिन्यांचा कालावधी देण्यात आला. यापूर्वी अंतिम तारीख 30 सप्टेंबर ठेवण्यात आली होती. नंतर ती 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली. तोपर्यंत नोटा कोणत्याही बँक किंवा RBI च्या 19 इश्यू ऑफिसमध्ये बदलल्या जाऊ शकतात.

हेही वाचा – कमाई असावी तर शुबमन गिलसारखी! आवडती गाडी घेतली, प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक, आणि…

आता नोटा कशा बदलल्या जातील?

आता तुम्ही RBI च्या 19 इश्यू ऑफिसमधून 2000 रुपयांच्या नोटा पाठवू शकता. ही ऑफिस दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता यासह देशातील प्रमुख शहरांमध्ये आहेत. याशिवाय तुम्ही ही नोटा भारतीय पोस्टद्वारे आरबीआय ऑफिसमध्ये पाठवू शकता. यासोबत तुमचे वैध ओळखपत्र असावे. पॅन कार्ड, आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स ही वैध ओळखपत्रे आहेत. नोट जमा केल्यानंतर तुमच्या खात्यात त्याचे पैसे येतील.

2000 च्या नोटा का आल्या आणि गेल्या?

2000 रुपयांची नोट क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत डिक्रिक्युलेट करण्यात आली होती. 2016 मध्ये नोटाबंदीनंतर बाजारात रोखीची कमतरता भरून काढण्यासाठी त्या आणल्या गेल्या. जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यामुळे बाजारात रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाला होता. पण 500 रुपयांच्या आणि इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात बाजारात आल्यावर 2000 रुपयांच्या नोटेचे कामही संपले. त्यामुळे 2018-19 मध्ये 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली होती. 2000 रुपयांच्या नोटा अजूनही वैध असल्याचे RBI ने म्हटले आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment