Honda Cheapest 100cc Affordable Bike : होंडा मोटरसायकल स्कूटर इंडिया १५ मार्च रोजी देशांतर्गत बाजारात आपली नवीन परवडणारी बाईक लॉन्च करणार आहे. कंपनीने याआधीच १००cc सेगमेंटमध्ये नवीन मोटरसायकल लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. आज कंपनीने या बाईकचा एक नवीन टीझर व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामध्ये बाइकच्या संभाव्य डिझाइनची झलक दिसली आहे. ही बाईक बाजारात आल्यानंतर थेट Hero Splendor शी टक्कर देईल असे सांगण्यात येत आहे.
या नवीन टीझर व्हिडिओमध्ये बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता जिमी शेरगिल बाईकच्या आगमनाची घोषणा करताना दिसत आहे, “कमी खर्च और अधिक चर्चा, आ रहा है होंडा की सौ.” सध्या, डिलक्स ड्रीम ही कंपनीच्या पोर्टफोलिओमधील सर्वात स्वस्त बाईक आहे ज्याच्या किमती रु.७११३३ पासून सुरू होतात. ही आगामी बाईक यापेक्षाही स्वस्त असू शकते असे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा – 7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी DA थकबाकीबाबत खुशखबर..! सरकार करणार ‘ही’ घोषणा!
Bringing the trust of Honda to your home in just a few more days. Stay tuned for the new Honda Ki Sau.
For more information, please give us a missed call on +919311340947 or visit our website.#Honda #PowerOfDreams pic.twitter.com/NcfsO9cKC2
— Honda 2 Wheelers (@honda2wheelerin) March 3, 2023
१००cc सेगमेंट देशात खूप लोकप्रिय आहे आणि या सेगमेंटमध्ये Hero Splendor ला सर्वाधिक पसंती आहे. ही आगामी होंडा बाईक प्रामुख्याने स्प्लेंडर प्लसशी स्पर्धा करेल असे सांगण्यात येत आहे. जर तुम्ही Honda च्या पोर्टफोलिओवर नजर टाकली तर, CD ११० Deluxe, SP १२५ आणि Shine सारखी मॉडेल्स प्रवाशांच्या सेगमेंटमध्ये उपलब्ध आहेत. देशातील सर्वाधिक ग्राहक असलेला हा विभाग आहे.
सध्याचे CD Deluxe मॉडेल १०९.५१cc इंजिन वापरते जे ८.७bhp पॉवर आणि ९.३Nm टॉर्क जनरेट करते. कंपनी आपल्या नवीन बाईकमध्येही हेच इंजिन वापरण्याची शक्यता आहे. साधारणपणे ही बाईक ६० ते ६५ kmpl चा मायलेज देण्यास सक्षम असते. तथापि, बाइकचे मायलेज मुख्यत्वे रस्त्याची स्थिती आणि ड्रायव्हिंग शैलीवर अवलंबून असते. होंडाच्या या नवीन १००cc बाईकची किंमत खूपच कमी असेल आणि अधिक मायलेज देईल.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!