

Honda Shine Offer : तुम्हाला कमी किमतीत उत्तम फीचर्स असलेली बाईक हवी असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. यामध्ये तुम्ही फक्त रु.३९९९ चे डाउन पेमेंट भरून उत्तम मायलेज देणारी होंडा बाईक घरी घेऊ शकता. यासोबतच या बाईकच्या खरेदीवर तुम्हाला इतरही अनेक ऑफर्स मिळतील. आम्ही ज्या बाईकबद्दल बोलत आहोत त्याचे नाव होंडा शाईन (Honda Shine) आहे.
तुम्ही केवळ रु. ३९९९ च्या डाउन पेमेंटसह Honda Shine घरी आणू शकत नाही, तर तुम्हाला या बाइकच्या खरेदीवर फक्त ७.९९ टक्के व्याज द्यावे लागेल, जे खूपच कमी आहे. यासोबतच कंपनी या बाइकवर ५००० रुपयांपर्यंतचा कॅशबॅकही देत आहे. ही मर्यादित ऑफर ३१ मार्चपर्यंत आहे.
अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता कॅशबॅक ऑफरचा लाभ
जर तुम्हाला कॅशबॅक ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी तुम्हाला किमान ४०००० रुपयांचा व्यवहार करावा लागेल. एसबीआय कार्डद्वारे सहा महिने किंवा त्याहून अधिक कालावधीच्या ईएमआय व्यवहारांवर याचा लाभ घेता येईल. त्याच वेळी, असे ग्राहक फायनान्स स्कीमचा लाभ घेऊ शकतात, जे व्यवहाराचे निकष पूर्ण करतात.
हेही वाचा – Electric Bike : तरुणांना आवडेल अशी इलेक्ट्रिक बाईक..! १२५ किमीची दमदार रेंज; किंमत आहे…
Honda Shine फीचर्स आणि किंमत
Honda Shine मध्ये सिंगल सिलेंडर १२४cc एअर-कूल्ड फ्युएल इंजेक्टेड इंजिन आहे जे १०.७ps पॉवर आणि ११Nm टॉर्क जनरेट करते. यात पाच-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. त्याच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात इंजिन किल स्विच, i3s स्टार्ट-स्टॉप तंत्रज्ञान, ऑटो सेल तंत्रज्ञान आणि रिअल-टाइम इंधन निर्देशक मिळतो. यात एलईडी हेडलॅम्प, यूएसबी पोर्ट, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, गियर पोझिशन इंडिकेटर आणि बॅक अँगल सेन्सर देखील मिळतो. या बाईकची किंमत ७७,५९२ रुपये ते ८३,०९२रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पर्यंत आहे. ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये ६५ किलोमीटरपर्यंत मायलेज देते.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!