विसरून जाल Activa..! भारतात येतेय होंडाची ‘शक्तिशाली’ स्कूटर; बुलेटपेक्षा भारी इंजिन!

WhatsApp Group

Honda Forza 350 : होंडा अॅक्टिव्हा (Honda Activa) ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात लोकप्रिय स्कूटरपैकी एक आहे आणि देशातील सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. या स्कूटरने परवडणारा दैनंदिन प्रवासी म्हणून जी प्रतिष्ठा कमावली आहे ते नाकारता येत नाही. पण आता असे दिसते आहे की होंडा येथील बाजारपेठेसाठी काहीतरी मोठे तयार करत आहे. Honda ने अलीकडेच आपल्या नवीन मॅक्सी स्कूटर Forza 350 च्या डिझाईनचे भारतीय बाजारात पेटंट घेतले आहे. जरी ही स्कूटर आधीच जागतिक बाजारपेठेत आहे आणि याआधीही ही स्कूटर भारतात लॉन्च करण्याचे उल्लेख अनेकदा आले आहेत.

Honda Forza 350 ही मॅक्सी स्कूटर म्हणून खूप लोकप्रिय आहे आणि भारतीय बाजारात ती लॉन्च झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. ऑटोकारच्या रिपोर्टनुसार, होंडाने आता भारतात या स्कूटरच्या डिझाइनचे पेटंट घेतले आहे. कंपनीने अद्याप याबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. काही वर्षांपूर्वी होंडाने स्कूटरचे प्रदर्शन मर्यादित डीलर्सना केले होते.

वास्तविक, या शोकेसच्या निमित्ताने, कंपनीला भारतीय बाजारपेठेत मॅक्सी-स्कूटरचे भविष्य काय आहे याची पुष्टी करायची होती. अनेक वाहन उत्पादक हे करतच असतात, ज्यांना त्यांची आगामी वाहने डीलर्सना दाखवून बाजारात त्या वाहनांचे भविष्य काय असेल हे जाणून घ्यायचे असते. होंडाने याआधी अनेकवेळा जागतिक मॉडेल्सचे पेटंट घेतले असले तरी ती मॉडेल्स येथे लाँच झालेली नाहीत.

हेही वाचा – IND Vs AUS : रोहित शर्माच्या ‘त्या’ अँग्री मेसेजनंतर पुजाराने ठोकला षटकार..! Video झाला व्हायरल

Honda Forza 350 maxi-scooter patented in India know details

Honda Forza 350 स्कूटरबाबत…

या मॅक्सी-स्कूटरबद्दल बोलताना, ग्लोबल मॉडेलमध्ये, कंपनीने ३३०cc क्षमतेचे लिक्विड-कूल्ड फोर-स्ट्रोक इंजिन वापरले आहे, जे २१.५ kW (सुमारे २८.८Hp) ची मजबूत पॉवर आणि ३१.५ Nm टॉर्क जनरेट करते. या स्कूटरच्या पॉवर आउटपुटचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की, भारतीय बाजारात सध्याचे रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० इंजिन २०.२१ एचपी पॉवर जनरेट करते. बरं, इलेक्ट्रॉनिक फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या स्कूटरमध्ये कंपनीने ११.७ लीटर क्षमतेची इंधन टाकी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर २९.४ किलोमीटर प्रति लीटरपर्यंत मायलेज देते.

स्कूटरचा आकार :

  • लांबी : २१४७ मिमी
  • रुंदी : ७५४ मिमी
  • उंची : १५०७ मिमी
  • वजन : १८४ किलो

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने या स्कूटरमध्ये स्पोर्टी फीचर्स समाविष्ट केले आहेत जे त्याच्या लुकशी पूर्णपणे जुळतात. त्यात एक एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे, ज्यामध्ये स्पीडोमीटर, इंधन मापक, तापमान मापक, पॉइंटर प्रकार, घड्याळ, दोन ट्रिप मीटर, इंधन वापर गेज आणि होंडा स्मार्ट की इंडिकेटर यांसारखी माहिती उपलब्ध आहे. या स्कूटरमध्ये Honda ने SMART Key देखील दिली आहे, जी भारतीय बाजारात नुकत्याच लॉन्च झालेल्या नवीन Activa प्रमाणे रिमोट प्रमाणे चालवता येते.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment