Honda Motorcycle and Scooter India ने 2023 Dio स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरची सुरुवातीची किंमत 70,211 रुपये आहे. नवीन Dio आता 3 प्रकारांमध्ये उपलब्ध असेल, स्टँडर्ड, डिलक्स आणि स्मार्ट. ज्यांची किंमत अनुक्रमे 70,211 रुपये, 74,212 रुपये आणि रुपये 77,712 (एक्स-शोरूम) आहे. Dio ला आता स्मार्ट फाइंड, स्मार्ट अनलॉक, स्मार्ट स्टार्ट आणि स्मार्ट सेफ यांसारख्या फीचर्ससह स्मार्ट की (Smart Key) मिळते. स्मार्ट कीमुळे यात अँटी-थेफ्ट सिस्टम आहे. जेव्हा चावी 2 मीटरपेक्षा जास्त अंतरावर असते तेव्हा हे फीचर स्कूटरला लॉक करते.
नवीन Dio स्कूटरला BSVI OBD2 सह 110cc PGM-FI इंजिन मिळेल. हे इंजिन 7.65bhp आणि 9Nm पीक टॉर्क जनरेट करते. स्कूटरला पूर्ण डिजिटल मीटर मिळतो, जो रेंज, सरासरी मायलेज आणि रिअल टाइम मायलेज यांसारखी माहिती देतो. एकूण प्रवास वेळ आणि सेवा निर्देशक यासारखी माहिती देखील मीटरमध्ये उपलब्ध आहे. हे डिजिटल मीटर डिलक्स आणि स्मार्ट व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. याला इंजिन इनहिबिटरसह साइड स्टँड इंडिकेटर देखील मिळतो. स्टार्ट/स्टॉप स्विचसह इंजिन सुरू केले जाऊ शकते.
2023 Honda Dio has been launched with updated OBD2 Compliant engine at a starting price of Rs. 70,211, ex-showroom, New Delhi.
✅ The scooter now comes with Honda Smart Key System, which was introduced earlier this year on the Honda Activa 2023, offers features like smart find,… pic.twitter.com/ZAZaSxGoh8
— 91Wheels.com (@91wheels) June 13, 2023
हेही वाचा – SUV, MUV आणि XUV मध्ये फरक काय? सोप्या शब्दात समजा!
यात एलईडी हेडलॅम्प, फ्रंट पॉकेट आणि एलईडी डेटाइम रनिंग लॅम्पसह पासिंग स्विच असेल. 2023 Honda Dio ला 160mm ग्राउंड क्लीयरन्स, 18-लिटर स्टोरेज कंपार्टमेंट आणि दोन-कॅप फ्युएल ओपनिंग सिस्टम मिळते. यात टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन आणि कॉम्बी-ब्रेक सिस्टीम (सीबीएस) इक्वेलायझर आणि 3-स्टेप अॅडजस्टेबल रिअर सस्पेंशन मिळते. Honda सोबत 10 वर्षांची वॉरंटी पॅकेज देखील देत आहे, ज्यामध्ये 3 वर्षांची मानक आणि 7 वर्षांची एक्स्टेंड वॉरंटी आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!