ऐकलं का..! Honda ने बंद केली ‘ही’ लोकप्रिय कार; जाणून घ्या कारण!

WhatsApp Group

Honda Discontinued This Car : होंडाच्या गाड्या आधीच भारतात टिकून राहण्यासाठी संघर्ष करत आहे. दरम्यान, कंपनीसाठी आणखी एक वाईट बातमी आली आहे. कंपनीला आपल्या सर्वात स्वस्त कारचे डिझेल मॉडेल बंद करावे लागले आहे. ही Honda Amaze कार आहे, जी कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी कार देखील आहे. कंपनीने अधिकृतपणे अमेझ डिझेल मॉडेल आपल्या वेबसाइटवरून काढून टाकले आहे. डिझेल इंजिन देणारी कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमधील ही एकमेव कार होती. या विभागात Honda Amaze, Hyundai Aura, Tata Tigor आणि Maruti Suzuki Dzire यांचा समावेश आहे.

बंद करण्याचे कारण काय?

वास्तविक, रिअल ड्रायव्हिंग एमिशन (RDE) नियम भारतात एप्रिल २०२३ पासून लागू होणार आहेत. यामुळेच कंपनीने अमेझचे डिझेल इंजिन बंद केले आहे. नवीन उत्सर्जन मानदंड पूर्ण करण्यासाठी डिझेल इंजिन अपग्रेड करावे लागतील, जे खूप महाग आहे. शिवाय या विभागात डिझेलची मागणीही फारशी नव्हती. अशा स्थितीत कंपनी बंद करण्याचा एकच मार्ग उरला होता.

हेही वाचा – Amazon Great Republic Day Sale : अर्ध्या किंमतीत घरी आणा AC, फ्रिज..! अॅमेझॉनवर बंपर सेल सुरू

हे मॉडेल्सही बंद होतीला

होंडाची सध्या भारतात आणखी दोन डिझेल मॉडेल्स आहेत. या Honda WR-V आणि 5th gen City आहेत. या दोन्हीही लवकरच टप्प्याटप्प्याने बंद केल्या जातील आणि कंपनी फेब्रुवारी २०२३ पासून डिझेल इंजिनचे उत्पादन बंद करेल. आता Honda Amaze फक्त १.२-लीटर i-VTEC पेट्रोल इंजिनसह उपलब्ध असेल. Amaze ची किंमत ६.८९ लाख ते ९.४८ लाख रुपये (एक्स-शोरूम, भारत) दरम्यान आहे.

Honda ने प्रथम १.५-लिटर डिझेल इंजिन अमेझ सह भारतात सादर केले. हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह १००hp आणि २००Nm टॉर्क जनरेट करते. CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्यायही आहे. यामुळे अमेझ ही त्याच्या विभागातील एकमेव डिझेल ऑटोमॅटिक कॉम्पॅक्ट सेडान बनली. होंडा आता एका एसयूव्हीवर काम करत आहे, ज्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. ही Honda SUV २०२३ च्या सणासुदीच्या हंगामात लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment