अचानक असं काय झालं, देशभरातील पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या?

WhatsApp Group

नवीन हिट अँड रन (Hit And Run Law) कायद्याचा देशभरातून निषेध होत आहे. बहुतांश राज्यांतील ट्रकचालक या कायद्याला विरोध करत आहेत. कारण या अंतर्गत आता आणखी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरयाणा, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, पंजाबसह अनेक राज्यांमध्ये ट्रक थांबल्याने परिस्थिती गंभीर होत आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावरही परिणाम होत आहे. अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची भीती पाहता पेट्रोल पंपावर नागरिकांची गर्दी होत आहे. पेट्रोल, डिझेल घेऊन येणारे टँकरही संपात सहभागी झाल्याने ही परिस्थिती निर्माण होत आहे. आपल्या शहरात पेट्रोल आणि डिझेल संपेल की काय अशी भीती लोकांना वाटत आहे.

वाहतूक कोंडी, पेट्रोल पंपावर गर्दी का?

नवीन हिट अँड रन कायद्यांतर्गत कोणी दोषी आढळल्यास 10 वर्षांचा कारावास आणि 10 लाख रुपये दंडाची तरतूद लागू करण्यात आली आहे. आगामी काळात, त्याच्या नवीन तरतुदी भारतीय दंड संहितेच्या (IPC) जुन्या तरतुदींची जागा घेतील. मात्र नव्या तरतुदीबाबत विरोध सुरू झाला आहे.

नवीन कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद

नवीन तरतुदीनुसार, रस्ता अपघातात एखाद्याचा मृत्यू झाल्यास आणि वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्यास त्याला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते आणि दंडही भरावा लागणार आहे. हिट अँड रन प्रकरणात यापूर्वी दोन वर्षांच्या कारावासाची तरतूद होती आणि जामीनही सहज मिळत होता. या कठोर तरतुदी त्याच्या विरोधाचे कारण ठरत आहेत.

हिट अँड रन प्रकरणे रस्ते अपघातांशी संबंधित आहेत. हिट अँड रन म्हणजे रॅश आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्यामुळे एखाद्या व्यक्तीचे किंवा मालमत्तेचे नुकसान करणे आणि नंतर पळून जाणे. अशा स्थितीत पुरावे आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्यामुळे दोषींना पकडणे आणि शिक्षा करणे कठीण होऊन बसते.

नवीन नियमाची गरज का होती?

सध्या, हिट अँड रन प्रकरणांमध्ये सर्वात मोठी समस्या ही आहे की गुन्ह्याच्या ठिकाणी गुन्हेगाराविरुद्ध थेट पुराव्यांचा अभाव आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांना तपास पुढे नेणे आणि गुन्हेगार शोधणे अत्यंत अवघड होऊन बसते. यातील बहुतांश गुन्हेगार पळून जातात आणि क्वचितच पकडले जातात. दुसरी अडचण अशी आहे की ज्यांच्यावर तपास अवलंबून आहे ते साक्षीदारही मदत करण्यास टाळाटाळ करतात, कारण त्यांना कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अडचणीत अडकायचे नसते.

हेही वाचा – ‘या’ देशात रिटायरमेंटनंतर मिळते दरमहा 2 लाखांची पेन्शन, भारतात स्थिती काय? जाणून घ्या!

रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात हिट अँड रन रोड अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे धक्कादायक आहे. 2020 मध्ये एकूण 52,448 हिट-अँड-रन प्रकरणे नोंदवली गेली ज्यात 23,159 लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्याच वेळी 2021 मध्ये हा आकडा वाढला आणि या वर्षी अशा 57,415 घटना घडल्या ज्यात 25,938 लोकांना आपला जीव गमवावा लागला.

विरोध कशाला?

नवीन नियम लागू केल्याने वाहनचालकांमध्ये त्यांच्याविरुद्ध कारवाई होण्याची भीती आहे. नव्या नियमांनुसार जखमींच्या मदतीसाठी गेल्यास त्यांना जमावाच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष अमृतलाल मदान यांचा दावा आहे, की दुरुस्तीपूर्वी जबाबदार व्यक्तींकडून सूचना घेण्यात आल्या नाहीत. याशिवाय देशात अपघात तपासणी प्रोटोकॉलचा अभाव असल्याचेही मदन म्हणाले. पोलीस कोणताही शास्त्रीय तपास न करता मोठ्या गाड्यांना दोष देतात, असे काहींचे मत आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment