Hiring Alert : येणारा काळ नोकऱ्यांच्या बाबतीत खूप चांगला जाणार आहे. जगातील आघाडीची टेक कंपनी ॲपलने भारतात लाखो नोकऱ्या उपलब्ध (Apple Create 5 Lakh Jobs In India) करून देण्याची घोषणा केली आहे. सरकारने जारी केलेल्या अहवालात हा खुलासा करण्यात आला आहे. मार्केट कॅपच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी कंपनी ॲपल आपला व्यवसाय चीनमधून भारतात हलवत असून येथे आपला व्यवसाय वाढवण्यावर भर देत असल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात कंपनीने आपले उत्पादन 4 पटीने वाढविण्याचेही नियोजन केले आहे.
आयफोनसारखे प्रीमियम मोबाईल बनवणाऱ्या ॲपल कंपनीने भारतात 5 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे. येत्या 3 वर्षात भारतात आपला व्यवसाय वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. त्यासाठी आपल्या विक्रेत्यांमार्फत लाखो भरतीही करणार आहे. सध्या, सुमारे 1.5 लाख लोक ॲपलचे विक्रेते आणि पुरवठादारांसोबत काम करतात. ॲपलने जेव्हापासून टाटा इलेक्ट्रॉनिक्सशी हातमिळवणी केली आहे, तेव्हापासून ती मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणारी कंपनी बनली आहे.
हेही वाचा – IPL 2024 : विराट कोहलीची सेंच्युरी हुकली, RCB चे पंजाबला 242 रन्सचे टार्गेट!
40 अब्ज डॉलर्सचे उत्पादन
एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, ॲपल देशात भरती वाढवत आहे. कंपनी देशात आपला व्यवसाय वाढवत आहे. 4 ते 5 वर्षांत कंपनीचे उत्पादन 4 पटीने वाढवून सुमारे $40 अब्ज (3.25 लाख कोटी रुपये) करण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे. कंपनीने नुकतेच बंगळुरू येथे एक कार्यालय देखील उघडले आहे, ज्यामध्ये 1200 कर्मचारी काम करतात.
भारतात प्रथमच शीर्षस्थानी
नुकत्याच आलेल्या एका अहवालात असे समोर आले आहे की, 2023 मध्ये ॲपल पहिल्यांदाच कमाईच्या बाबतीत भारतीय बाजारपेठेत अव्वल स्थानावर पोहोचले आहे. कंपनीचा दावा आहे की त्यांनी प्रथमच 1 कोटी मोबाईल विकले आणि एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक कमाईचा विक्रमही केला. भारतातून आयफोनची निर्यातही वाढत आहे. 2022-23 मध्ये निर्यात 6.27 अब्ज डॉलरची होती, तर 2023-24 मध्ये ती 12.1 अब्ज डॉलरपर्यंत वाढली आहे, जी जवळपास दुप्पट आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा