Himachal Pradesh Landslide : हिमाचल प्रदेशात कुल्लू येथे भीषण भूस्खलनामुळे अनेक घरे कोसळली आहेत. डोंगराळ भागात झालेल्या प्रचंड भूस्खलनात कोसळलेल्या इमारती आणि घरांच्या ढिगाऱ्यात अनेक लोक अडकल्याची भीती आहे. या भूस्खलनाचा एक धोकादायक व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये डोंगराला तडे गेल्याने दरीतील घरे कशी कोसळली हे पाहता येते. भूस्खलनाच्या दृश्यांमध्ये अनेक बहुमजली इमारती कोसळताना दिसत आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) आजपासून पुढील दोन दिवस हिमाचल प्रदेशात मुसळधार ते अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू असून, त्यामुळे रहिवाशांना तीव्र हवामानाचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे खराब झालेल्या कुल्लू-मंडी महामार्गावर आज शेकडो वाहने अडकून पडली आहेत. “कुल्लू आणि मंडीला जोडणारा रस्ता खराब झाला आहे. पंडोह मार्गे पर्यायी मार्गाचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या वाहतूक ठप्प आहे,” असे कुलूचे वरिष्ठ पोलिस अधिकारी साक्षी वर्मा यांनी वृत्तसंस्था एएनआयने सांगितले.
हेही वाचा – Maharashtra : चालत्या ट्रेनमध्ये चढणे अत्यंत धोकादायक, कापले गेले तरुणाचे दोन्ही पाय! पाहा VIDEO
सततच्या पावसाने पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील डोंगराळ राज्यात भूस्खलन, ढग फुटणे आणि अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर विनाश घडवून आणला आहे. राज्य सरकारने यापूर्वी संपूर्ण राज्याला “नैसर्गिक आपत्तीग्रस्त क्षेत्र” म्हणून घोषित केले होते आणि नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि बाधित लोकांना मदत देण्याचे काम करत आहे. या पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे एकूण 709 रस्ते बंद झाले आहेत. हिमाचल प्रदेश सरकारचा अंदाज आहे की राज्यामध्ये मान्सून दाखल झाल्यापासून 24 जूनपासून सार्वजनिक पायाभूत सुविधांचे एकूण 8,014.61 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार, पावसामुळे 2,022 घरांचे पूर्ण नुकसान झाले असून 9,615 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. राज्यात 113 भूस्खलनाचीही नोंद झाली आहे, ज्यामुळे पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि हजारो लोक बेघर झाले आहेत. एका सरकारी बुलेटिनमध्ये पावसामुळे २२४ जणांचा मृत्यू झाला, तर पावसाशी संबंधित अपघातांमध्ये ११७ जणांचा मृत्यू झाला.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!