Himachal Pradesh Election 2022 : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये १२ नोव्हेंबरला मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी सांगितले. ८ डिसेंबरला निकाल लागणार आहे. राज्यात विधानसभेच्या ६८ जागांसाठी निवडणूक होणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार असल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले. प्रत्येक मतदान केंद्र तळमजल्यावरच असेल, असे त्यांनी सांगितले.
हिमाचल प्रदेशात ५५ लाख मतदार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. यामध्ये २७ लाख ८० हजार पुरुष आणि २७ लाख २७ हजार महिला सहभागी होणार आहेत. निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सेवेतील कर्मचाऱ्यांची संख्या ६७ हजार ५३२ असेल. याशिवाय ८० वर्षांवरील १.२२ लाख मतदार आहेत. यासोबतच ११८४ मतदार आहेत ज्यांचे वय १०० वर्षांपेक्षा जास्त आहे.
हेही वाचा – IND Vs PAK : टीम इंडिया पाकिस्तानात जाणार..! BCCI कडून हिरवा कंदील
आधी कुणी मारलीय बाजी?
हिमाचलमध्ये विधानसभेच्या एकूण ६८ जागा आहेत. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने ४४ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला २१, माकपला एक जागा मिळाली. भाजप सरकारला पाठिंबा देणारे दोन अपक्ष उमेदवारही आमदार झाले. नंतर काही सदस्यांच्या मृत्यूनंतर पोटनिवडणूकही घेण्यात आली, त्यानंतर राजकीय समीकरणात थोडा बदल झाला.
Schedule of Himachal Pradesh assembly election 2022 pic.twitter.com/ORAV7LDcSZ
— Alok K N Mishra HT (@AlokKNMishra) October 14, 2022
हिमाचल प्रदेश निवडणुकीच्या महत्वाच्या तारखा
- अधिकृत अधिसूचना तारीख – १७ ऑक्टोबर
- नामांकन – २५ ऑक्टोबर
- नामनिर्देशन छाननी – २७ ऑक्टोबर
- नामांकन मागे घेणे – २९ ऑक्टोबर
- निवडणुकीची तारीख – १२ नोव्हेंबर
- मतमोजणी – ८ डिसेंबर