तरुणांनो खूप दारू प्या..! जपान सरकारनं केलंय आवाहन; ‘हे’ आहे कारण!

WhatsApp Group

Japan government on alcohol : दारूपासून दूर राहण्यासाठी मित्र, नातेवाईक तुम्हाला रोज बरच काही सांगतात. लोकांना दारू न पिण्याचा सल्ला दिला जातो. सतत मद्यपान केल्यानं होणार्‍या आरोग्याची हानी बघून दारू सोडण्याची जाणीव जागृत होते, पण ती इच्छा सोडणं लोकांना फार कठीण जातं. एकीकडे बहुतांश लोक दारू सोडण्याच्या बाजूनं आहेत. तर दुसरीकडं जपान सरकार तरुणांना जास्तीत जास्त दारू पिण्याचं आवाहन करत आहे. जाणून घेऊया जपान सरकार असं आवाहन का करत आहे?

जपानमधील सध्याची पिढी त्यांचे आई-वडील, वडीलधारी किंवा पूर्वजांपेक्षा कमी दारू पीत आहे. त्यामुळं दारूवरील कर कमी झाला आहे. जपान सरकारला महसुलात कपात होईल या भीतीनं भविष्याची चिंता वाटू लागली आहे. नागरिकांना दारू प्यायला लावण्यासाठी सरकारनं व्यवसायाची कल्पना योजली आहे. राष्ट्रीय स्पर्धेच्या माध्यमातून सरकारनं ही कल्पना योजली आहे. या स्पर्धेत पुरस्कारही ठेवण्यात आला आहे. तरुण पिढीमध्ये अधिक मद्यपान केल्यानं जपानच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा सरकारचा विश्वास आहे. जास्त मद्य सेवन, आकर्षक ब्रँडिंग आणि उद्योगांना प्रोत्साहन देण्याची कल्पना या स्पर्धेत द्यावी लागेल.

हेही वाचा – दारू पिल्यानंतर लोक इंग्रजी का बोलू लागतात?

स्पर्धेत काय करावं लागेल?

या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत २० ते ३९ वयोगटातील युवक सहभागी होऊ शकतात. या विचारांतर्गत तरुणांना त्यांच्या पिढीत दारूचं सेवन कसं करता येईल हे सांगावं लागेल. कारण मद्यविक्रीत लक्षणीय घट झाली आहे. यामध्ये स्पर्धकांमध्ये प्रमोशन, ब्रँडिंग यासह अत्याधुनिक योजनांवरही रणनीती आखावी लागेल. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराला प्राधान्य दिलं जाईल.

जपानी माध्यमांचे म्हणणं आहे, की आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या दारू पिण्याच्या सवयीबद्दल काही टीकेसह संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. सोशल मीडियावरही काहींनी आपले विचार मांडले. इच्छुक तरुण सप्टेंबर अखेरपर्यंत यात सहभागी होऊ शकतात. नोव्हेंबरमध्ये अंतिम प्रस्ताव मांडण्यापूर्वी तज्ज्ञ लोकांचा सल्ला घेतला जाईल. यानंतर, अधिक दारू पिण्यासाठी एक योजना विकसित केली जाईल.

मद्य सेवन घटलं

तरुणांना अधिक दारू पिण्यास प्रोत्साहित करण्यासाठी एक वेबसाइट देखील आहे. जे म्हणतात की जपानचे वाईन मार्केट कमी होत आहे. टॅक्स एजन्सीच्या अलीकडील आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की १९९५ च्या तुलनेत २०२० मध्ये लोक कमी दारू पीत होते. अंदाजे मद्य सेवन एक चतुर्थांश कमी झालं आहे. जपान टाइम्स वृत्तपत्रानुसार, १९८० मध्ये एकूण महसुलाच्या ५ टक्के मद्य करानं गोळा केलं. तर २०२० मध्ये हा आकडा केवळ १.७ टक्के होता.

हेही वाचा – महिन्याला ८० हजार पगार आणि काम दारु पिणं..! ‘ही’ कंपनी देतेय नोकरी; वाचा!

जागतिक बँकेच्या मते, जपानमधील लोकसंख्येपैकी एक तृतीयांश (२९%) लोकसंख्या ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची आहे. जगातील सर्वाधिक प्रमाण जपानमध्ये आहे. जपानची चिंता केवळ अर्थव्यवस्थेची नाही. त्यापेक्षा काही नोकऱ्या, तरुण कर्मचाऱ्यांचा पुरवठा, भविष्यात वृद्धांची काळजी आदी समस्याही सोडविण्याचं नियोजन केलं जात आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment