VIDEO : गुजरातमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसचं नाक फुटलं..! नक्की काय झालं? इथं वाचा!

WhatsApp Group

Vande Bharat Express : अहमदाबादहून मुंबईकडे निघालेल्या वंदे भारत एक्सप्रेसचे (Mumbai-Ahmedabad VandeBharat Express) मोठे नुकसान झाले. वैतरणा ते मणिनगर दरम्यानची सेमी हायस्पीड मुंबई-अहमदाबाद वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी ११.१८च्या सुमारास जनावरांना धडकली. यानंतर या एक्स्प्रेसचे नाकच तुटले. गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये १ ऑक्टोबरपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आहे.

२०० किमी प्रतितास वेग

भारतीय रेल्वे सध्या आधुनिकतेवर भर देत आहे. रेल्वे स्थानकांची सुधारणा केली जात आहे. नवीन हायस्पीड गाड्या सुरू केल्या जात आहेत. यात, सरकारने भविष्यात भारतभर ४०० वंदे भारत ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाने लातूरमध्ये ट्रेन कोच मेंटेनन्स फॅक्टरीची पायाभरणी केली आहे. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (CMIA) तर्फे आयोजित ‘डेस्टिनेशन मराठवाडा’ कार्यक्रमाला संबोधित करताना, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे सुमारे १६०० डबे तयार केले जातील. यातील प्रत्येकी ८ कोटी ते ९ कोटी रुपये खर्च येईल. सरकारच्या म्हणण्यानुसार नवीन वंदे भारत गाड्या जास्तीत जास्त २०० किमी प्रतितास (किमी प्रतितास) वेग गाठू शकतील.

हेही वाचा – रजनीकांत यांच्या प्रयत्नांना यश..! धनुषनं घेतला त्याच्या आयुष्यातील ‘मोठा’ निर्णय; वाचा!

नवीन हायस्पीड गाड्या सुरू करण्याबरोबरच रेल्वे स्थानकांचे सातत्याने अपग्रेडेशन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारने २०० रेल्वे स्थानकांच्या पुनर्बांधणीसाठी मास्टर प्लॅन तयार केला असून आतापर्यंत ४७ स्थानकांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर ३२ स्थानकांच्या आधुनिकीकरणाचे कामही सुरू करण्यात आले आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment