दोन वेण्या घातल्या नाहीत म्हणून मुख्याध्यापिकेची शाळेच्या मुलींना बेदम मारहाण, एक बेशुद्ध!

WhatsApp Group

UP News : उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील एका शाळेत धक्कादायक घटना घडली आहे. विद्यार्थिनींनी दोन वेण्या न घातल्यामुळे मुख्याध्यापिकेने त्यांना बेदम मारहाण केली. मुख्याध्यापिकेने विद्यार्थिनीच्या तोंडात काठीही घातली, त्यामुळे ती बेशुद्ध झाली. ही बाब पालकांना समजताच त्यांनी शाळा गाठली. तेथे त्यांनी मोठा गोंधळ घातला. यावेळी पोलिसांनाही माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कसेबसे लोकांना शांत केले. बीईओही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनेची माहिती घेतली आणि बीएसएला अहवाल पाठवला.

खोराबार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोतीराम अड्डा येथे ही घटना घडली. येथील माध्यमिक शाळेत गुरुवारी मुले नेहमीप्रमाणे शाळेत पोहोचली. सकाळची प्रार्थना सभा होणार होती. त्यानंतर मुख्याध्यापिका आभा दुबे यांच्या काही विद्यार्थिनींच्या नजरेस पडल्या. त्यांनी दोन वेण्या घातल्या नव्हत्या, हे पाहून दुबेंना धक्काच बसला. काहीही न विचारता त्यांनी विद्यार्थिनींचे केस ओढण्यास सुरुवात केली. त्यांना धक्काबुक्की केली आणि नंतर चापट मारली. यानेही त्यांचे समाधान झाले नाही म्हणून त्यांनी जवळच असलेल्या काठीने त्यांना बेदम मारहाण केली.

हेही वाचा – 12 चौकार आणि 3 षटकार, टीम इंडियात जागा नसलेल्या संजू सॅमसनचे ‘रेकॉर्ड’ शतक!

असा आरोप आहे की त्यांनी आठवीच्या विद्यार्थिनीच्या तोंडात काठी घातली, त्यामुळे ती बेशुद्ध पडली. हा प्रकार पाहून तेथे उपस्थित असलेल्या विद्यार्थिनींना धक्काच बसला आणि त्या जोरजोरात रडू लागल्या. दरम्यान, पालकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी शाळेत पोहोचून गोंधळ घालत मुख्याध्यापिकेच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यांनी सांगितले की, मुख्याध्यापिकेने याआधीही विद्यार्थिनींना अनेकदा शिवीगाळ व बेदम मारहाण केली होती. त्यांना स्वतःला शिकवावेसे वाटत नाही. त्या अनेकदा शाळेत उशिरा येतात. एवढेच नाही तर त्या अनेकदा शाळेत गैरहजर असतात. शाळेत आल्यावर त्या त्यांचा सर्व राग विद्यार्थ्यांवर काढतात.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment