

HDFC : तुम्हीही HDFC लिमिटेड (HDFC Ltd.) कडून गृहकर्ज घेतले असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. HDFC ने पुन्हा एकदा प्राइम लेंडिंग रेटमध्ये ०.३५ टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे गृहकर्जाचा किमान व्याजदर ८.६५ टक्के झाला आहे. नवे दर मंगळवारपासून म्हणजेच २० डिसेंबरपासून लागू करण्यात आले आहेत. एचडीएफसीने शेअर बाजाराला पाठवलेल्या माहितीमध्ये प्राइम लेंडिंग रेट ०.३५ टक्क्यांनी वाढवून ८.६५ टक्के करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मे महिन्यापासून HDFC ने कर्जाचा दर २.२५ टक्क्यांनी वाढवला आहे. एचडीएफसीने सांगितले की, ८.६५ टक्के नवा दर फक्त त्या ग्राहकांसाठी लागू होईल ज्यांचा ‘क्रेडिट स्कोअर’ ८०० किंवा त्याहून अधिक असेल. गृहकर्जाचा हा सर्वात कमी दर असल्याचा कंपनीचा दावा आहे. यापूर्वी, एचडीएफसी बँकेने दरमहा १० लाख क्रेडिट कार्ड जारी करण्याची घोषणा केली होती. यासह बँकेच्या ग्राहकांना थेट लाभ देण्याची योजना आहे.
हेही वाचा – Gas Cylinder : ऐतिहासिक घोषणा..! ‘या’ तारखेपासून फक्त ५०० रुपयांमध्ये मिळणार गॅस सिलिंडर
#HDFC
Revises retail prime lending rates by 0.35% from
Dec 20, 2022@CNBC_Awaaz— Neeraj Bajpai (@NeerajCNBC) December 20, 2022
बँकेच्या वतीने दर महिन्याला 10 लाख क्रेडिट कार्ड जारी करण्याची योजना पूर्ण करण्यासाठी बँकेने ग्राहकांच्या फायद्यांशी संबंधित योजना तयार केली आहे. क्रेडिट कार्डवरील खर्च वाढवण्यासाठी ऑनलाइन रिटेलपासून ते फूड डिलिव्हरीपर्यंतच्या अनेक उद्योगांशी भागीदारी करण्याची योजना आहे. बँकेचे कंट्री हेड पराग राव यांनी दिलेल्या माहितीत, सध्या ही संख्या ५ लाख आहे, ती १० लाखांपर्यंत वाढवण्याची योजना आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी, ग्राहकांना कंपन्यांकडून मिळणाऱ्या योजनांचा लाभ मिळेल.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!