HDFC बँकेच्या ग्राहकांची चांदी..! मुदत ठेवींवर ७.७५% पर्यंत व्याज; जाणून घ्या लेटेस्ट रेट!

WhatsApp Group

HDFC Bank : खासगी क्षेत्रातील बँक HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, मुदत ठेवींवरील बँकेचे नवीन दर २४ जानेवारी २०२३ पासून लागू झाले आहेत. बँकेच्या ग्राहकांना मुदत ठेवीवर ३% ते ७% व्याज मिळेल. तर ज्येष्ठ नागरिकांना बँकेच्या एफडीवर अधिक व्याज मिळते. बँकेच्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकाला कमाल ७.७५ टक्के व्याज मिळत आहे.

HDFC बँक FD दर

HDFC बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, ग्राहकांना ७ दिवस ते २९ दिवसांच्या FD वर ३% व्याज, ३० दिवस ते ४५ दिवसांच्या FD वर ३.५०% व्याज, ४६ दिवस ते ६ महिन्यांच्या FD वर ४.५०% व्याज मिळेल. ६ महिने ते ९ महिन्यांच्या FD वर ग्राहकांना ५.७५ टक्के व्याज मिळते.
याशिवाय ग्राहकांना ९ महिने ते १ वर्षाच्या एफडीवर ६ टक्के, १ वर्ष ते १५ महिन्यांपर्यंतच्या एफडीवर ६.६० टक्के, १५ महिने ते १० वर्षांपर्यंतच्या एफडीवर ७ टक्के व्याज मिळते.

हेही वाचा – Loan Application : तुम्हाला कर्ज मिळत नाहीये? वारंवार अर्ज नाकारला जातोय? ‘अशी’ करा समस्यांवर मात!

ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याज

HDFC बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना मुदत अधिक व्याज देते. येथे ग्राहकांना ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या FD वर ३.५०% ते ७.७५% पर्यंत व्याज मिळते.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment