HDFC Bank FD Rates : तुम्ही जर HDFC बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे, या अंतर्गत बँकेने मुदत ठेवीवरील व्याजदरात 0.20% ने वाढ करण्याची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठकीनंतर बँकेने आपल्या करोडो ग्राहकांना जास्त व्याज देण्याचा निर्णय घेतला. नवीन दर 10 जून 2024 पासून लागू झाले आहेत. मात्र, ही वाढ काही मुदतीच्या FD साठी करण्यात आली आहे.
2 वर्ष ते 5 वर्षांपर्यंत नवीन पर्याय
HDFC बँकेने 2 वर्ष ते 5 वर्षांपर्यंतचे नवीन FD पर्याय जोडले आहेत. यामध्ये 2 वर्षे 11 महिने 1 दिवस ते 3 वर्षे, 3 वर्षे 1 दिवस ते 4 वर्षे 7 महिने आणि 4 वर्षे 7 महिने 1 दिवस ते 5 वर्षे या FD वर 7.70% पर्यंत व्याज मिळेल.
हेही वाचा – BIG BREAKING : प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शनला हत्येप्रकरणी अटक!
HDFC बँक FD वर नवीन व्याजदर
7 दिवस ते 14 दिवस: 3%
15 दिवस ते 29 दिवस: 3%
30 दिवस ते 45 दिवस: 3.50%
46 दिवस ते 60 दिवस: 4.50%
61 दिवस ते 89 दिवस: 4.50%
90 दिवस ते 6 महिने: 4.50%
6 महिने 1 दिवस ते 9 महिन्यांपेक्षा कमी: 5.75%
9 महिने 1 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी: 6.00%
1 वर्ष ते 15 महिन्यांपेक्षा कमी: 6.60%
15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी: 7.10%
18 महिने 1 दिवस ते 21 महिन्यांपेक्षा कमी: 7.25%
21 महिने ते 2 वर्षे: 7.00%
2 वर्ष 1 दिवस आणि 2 वर्षे 11 महिने पेक्षा कमी: 7.15%
2 वर्षे 11 महिने 1 दिवस आणि 35 महिन्यांपर्यंत: 7.15%
2 वर्षे 11 महिने 1 दिवस आणि 3 वर्षांपर्यंत: 7.15%
3 वर्षे 1 दिवस ते 4 वर्षे 7 महिने: 7.20%
4 वर्षे 7 महिने ते 55 महिने: 7.20%
4 वर्षे 7 महिने 1 दिवस ते 5 वर्षांपेक्षा कमी: 7.20%
5 वर्षे ते 10 वर्षे: 7.00%
ज्येष्ठ नागरिकांना अधिक लाभ
एचडीएफसी बँक ज्येष्ठ नागरिकांना सर्वसामान्यांपेक्षा जास्त व्याजदर देते. ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर बँकेकडून 0.50% अधिक व्याज मिळेल. त्याच वेळी ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीच्या FD वर 0.75% अधिक व्याज मिळेल.
याशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटला भेट देऊ शकता, याशिवाय, तुम्ही एचडीएफसी बँकेच्या टोल-फ्री क्रमांक 1800-200-6565 वर कॉल करून देखील यासंबंधी माहिती मिळवू शकता.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा