HDFC Bank : देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या HDFC बँकेने कर्जे महाग केली आहेत. बँकेच्या या निर्णयामुळे लोकांच्या ईएमआयमध्ये वाढ होणार आहे. HDFC बँकेने MCLR (मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट्स) 15 बेस पॉईंट्सने वाढवले आहे. नवीन दरातील वाढ 7 जुलै 2023 पासून लागू झाली आहे.
जर तुम्ही HDFC बँकेच्या MCLR मधील वाढ बघितली तर, MCLR 15 बेस पॉईंट्सने 8.25 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे, जो पूर्वी 8.10 टक्के होता. एक महिन्याचा MCLR 8.20 टक्क्यांवरून 8.30 टक्क्यांपर्यंत 10 बेस पॉईंटच्या वाढीसह वाढवण्यात आला आहे. तीन महिन्यांचा दर 10 बेसिस पॉईंटने 8.60 टक्के, सहा महिन्यांचा दर 5 बेसिस पॉइंट्सने वाढवून 8.90 टक्के करण्यात आला आहे. एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी MCLR मध्ये कोणताही बदल झालेला नाही. एक वर्षाचा MCLR सध्या 9.05 टक्के आहे. एचडीएफसी बँकेची बहुतांश ग्राहक कर्जे याच्याशी जोडलेली आहेत.
हेही वाचा – स्वस्तात घर हवंय? तुमच्यासाठी चालून आली सुवर्णसंधी; PNB करतेय लिलाव!
HDFC बँकेच्या एमसीएलआर वाढवण्याच्या निर्णयाचा गृहकर्जाच्या व्याजदरांवर परिणाम होणार नाही. केवळ जुनी वैयक्तिक कर्जे आणि एमसीएलआरवर आधारित फ्लोटिंग ऑटो लोनचा व्याजदरावर परिणाम होईल. बँकांचे गृहकर्ज रेपो दराशी जोडलेले आहेत.
HDFC बँकेचा MCLR वाढवण्याचा निर्णय आश्चर्यकारक आहे. कारण RBI ने गेल्या दोन पतधोरण समितीच्या बैठकीत धोरणात्मक दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आणि तज्ञांचा असा विश्वास आहे की ऑगस्टच्या धोरणात्मक बैठकीतही, आरबीआय सध्याच्या दरांवर धोरणात्मक दर कायम ठेवू शकते.
मात्र, HDFC बँकेसाठी हा महिना खूप खास आहे. गृहनिर्माण वित्त कंपनी HDFC 1 जुलै 2023 पासून HDFC बँकेत विलीन झाली आहे. 13 जुलैपासून स्टॉक एक्स्चेंजवर एचडीएफसी शेअर्सचे व्यवहार थांबतील.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!