भारताचा सर्वात मोठा दानवीर, दर दिवसाला जवळपास 6 कोटींची देणगी!

WhatsApp Group

Shiv Nadar : टेक उद्योगपती शिव नाडर हे 2023-24 मध्ये देशातील सर्वात मोठे देणगीदार होते. एचसीएलचे सहसंस्थापक शिव आणि त्यांच्या कुटुंबाने 2,153 कोटी रुपयांची देणगी दिली. म्हणजे दररोज सुमारे 5.90 कोटी रुपये दिले जात होते. हुरुन इंडियाने गुरुवारी जारी केलेल्या एडलगिव्ह हुरुन इंडिया फिलान्थ्रॉपी लिस्ट-2024 नुसार, शिव नाडर सलग पाच वर्षांपासून पहिल्या स्थानावर आहे. देशातील सर्वात मोठ्या देणगीदारांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 दरम्यान दिलेल्या देणग्यांच्या डेटाच्या आधारे ही यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत अंबानी कुटुंब दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी 407 कोटी रुपयांची देणगी दिली.

रोहिणी नीलेकणी सर्वाधिक 154 कोटी देणगी देणाऱ्या होत्या. नीलेकणी दाम्पत्याने या यादीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले आहे. नंदन नीलेकणी 307 कोटींच्या देणगीसह सहाव्या स्थानावर आहेत. गौतम अदानी आणि कुटुंबीयांनी 330 कोटी रुपयांची देणगी दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत अदानी कुटुंबाच्या देणग्यांमध्ये 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अदानी फाऊंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, कौशल्य विकास आणि सामुदायिक आरोग्य कार्यक्रमांसाठी देणगी देण्यात आली.

हेही वाचा – 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी, ऑस्ट्रेलिया सरकारचा निर्णय

देणगीदारांनी शिक्षणासाठी सर्वाधिक 3,680 कोटी रुपयांची देणगी दिली. यादीत समाविष्ट असलेल्या 123 जणांनी ही देणगी दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात सुमारे 138 टक्के वाढ झाली आहे. यानंतर 626 कोटी रुपये आरोग्य सेवेसाठी, 331 कोटी रुपये ग्रामीण भागाच्या विकासासाठी, 177 कोटी रुपये पर्यावरण क्षेत्रासाठी आणि 202 कोटी रुपये इकोसिस्टम उभारणीसाठी देण्यात आले आहेत.

या यादीत सर्वाधिक दानवीर मुंबईतील (61) आहेत. नवी दिल्लीतील 39, बंगळुरूमधील 18, हैदराबादमधील 12 आणि पुण्यातील 11 जणांचा या यादीत समावेश आहे. अहमदाबादमधील 9, चेन्नईतील 8, कोलकातामधील 8, गुरुग्राममधील 5 आणि सुरतमधील 3 जणांचा या यादीत समावेश आहे. मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) यादीत 900 कोटी रुपयांच्या योगदानासह अव्वल स्थानावर आहे. रिलायन्सनंतर, नवीन जिंदाल यांच्या नेतृत्वाखालील जिंदाल स्टील अँड पॉवरने 228 कोटी रुपयांचे वाटप केले, जे निर्धारित CSR खर्चापेक्षा 50 कोटी रुपये जास्त आहे.

वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment