प्रोफेसर मॅकगोनिगल गेल्या..! ‘हॅरी पॉटर’ फेम अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचे निधन

WhatsApp Group

Actress Dame Maggie Smith Dies : ‘हॅरी पॉटर’ फेम हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचे लंडनमध्ये निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. डेम मॅगी स्मिथ यांना हॅरी पॉटर सिरीजमधील प्रोफेसर मॅकगोनिगल यांच्या भूमिकेतून सर्वाधिक लोकप्रियता मिळाली.

सोशल मीडियावर ही माहिती देताना त्यांची मुले टोबी स्टीफन्स आणि ख्रिस लार्किन यांनी लिहिले, ”अत्यंत दुःखाने कळवत आहे की मॅगी स्मिथ यांचे निधन झाले आहे. 27 सप्टेंबर रोजी सकाळी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्या काही काळ आजारी होत्या. त्यांच्या अखेरच्या क्षणी कुटुंबीय त्यांच्यासोबत उपस्थित होते.”

हेही वाचा – SIP कशी काम करते? कमी पैसै गुंतवून जास्त कसे मिळतात? जाणून घ्या

जिंकलेत दोन ऑस्कर

हॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत मॅगी यांच्या नावाचा समावेश होता. ब्रिटिश वंशाच्या मॅगी यांनी त्यांच्या कारकिर्दीत दोन ऑस्कर पुरस्कार जिंकले. त्यांनी 1970 मध्ये ‘द प्राइम ऑफ मिस जीन ब्रॉडी’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर आणि 1978 मध्ये ‘कॅलिफोर्निया सूट’साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर जिंकला.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment