Har Ghar Tiranga Abhiyan : २० वर्षांपूर्वी घरांवर तिरंगा फडकवणं बेकायदेशीर होतं! वाचा आपल्या राष्ट्रध्वजाबाबत…

WhatsApp Group

Har Ghar Tiranga Abhiyan 2022 : १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत देशभरात तिरंगा फडकवणं हे ‘हर घर तिरंगा अभियान २०२२’ हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे. लोकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणं आणि आझादीचा अमृत महोत्सव लोकसहभागाच्या भावनेनं साजरा करणं ही या मोहिमेमागील संकल्पना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासीयांना राष्ट्रध्वज ‘तिरंगा’ प्रोफाइल पिक्चर म्हणून लावण्याचं आवाहन केलं आहे.
आपला राष्ट्रध्वज तिरंगा नेहमी या स्वरूपात नव्हता. त्यात वेळोवेळी अनेक बदल झाले आहेत. आपल्या सर्वांना तिरंग्याबद्दल प्रेम आणि निष्ठा आहे, परंतु तिरंगा फडकवण्याचे नियम, चालीरीती आणि औपचारिकता फार कमी लोकांना माहिती आहे. ही सर्व माहिती भारत सरकारच्या वेबसाइट ‘नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर’ वरून घेण्यात आली आहे.

तिरंग्याचा इतिहास

२२ जुलै १९४७ रोजी झालेल्या भारतीय संविधान सभेच्या बैठकीत भारतीय राष्ट्रध्वज सध्याच्या स्वरूपात स्वीकारण्यात आला. १५ ऑगस्ट १९४७ ते २६ जानेवारी १९५० दरम्यान हा भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारण्यात आला आणि त्यानंतर भारतीय प्रजासत्ताकानं तो स्वीकारला. भारतातील “तिरंगा” म्हणजे भारतीय राष्ट्रध्वज.

तिरंगा कसा बनवला जातो?

भारतीय राष्ट्रध्वजावर तीन आडवे पट्टे आहेत, वरच्या बाजूला भगवा, मध्यभागी पांढरा आणि तळाशी गडद हिरवा आणि तिन्ही समान प्रमाणात आहेत. ध्वजाच्या रुंदीचं त्याच्या लांबीचं गुणोत्तर दोनास तीन असं आहे. पांढऱ्या पट्टीच्या मध्यभागी गडद निळं वर्तुळ आहे. हे चक्र अशोकाची राजधानी सारनाथच्या सिंहस्तंभावरून घेण्यात आलं आहे. त्याचा व्यास पांढऱ्या पट्टीच्या रुंदीएवढा आहे आणि त्यात २४ आरे आहेत.

हेही वाचा – या ‘एक’ कारणामुळं आमिर खान बॉलिवूड पार्ट्यांना जात नाही!

तिरंग्याच्या रंगांचं महत्त्व आणि चक्र

भारताच्या राष्ट्रध्वजाच्या वरच्या पट्टीला भगवा रंग आहे जो देशाची ताकद आणि धैर्य दर्शवतो. मध्यभागी असलेला पांढरा पट्टा धर्मचक्रासोबत शांती आणि सत्याचं प्रतीक आहे. खालची हिरवी पट्टी सुपीकता, वाढ आणि जमिनीची शुद्धता दर्शवते. पांढऱ्या पट्ट्यावरील चाकाला धर्मचक्र किंवा विधीचं चाक म्हणतात, जे मौर्य सम्राट अशोकानं ईसापूर्व तिसऱ्या शतकात बांधलेल्या सारनाथ मंदिरातून घेतलं आहे. हे चक्र दाखवण्याचा अर्थ असा आहे की जीवन गतिमान आहे आणि थांबणं म्हणजे मृत्यू.

ध्वज संहिता

२००२ पूर्वी, घरांवर, कार्यालयांवर ध्वजारोहण करण्यास परवानगी नव्हती, भारतीय ध्वज संहितेत २६ जानेवारी २००२ रोजी सुधारणा करण्यात आली आणि स्वातंत्र्याच्या अनेक वर्षानंतर, भारतातील नागरिकांना त्यांच्या घरांमध्ये, कार्यालयांमध्ये आणि कारखान्यांमध्ये राष्ट्रध्वज फडकवण्याची परवानगी देण्यात आली. आता भारतीय नागरिक अभिमानानं राष्ट्रध्वज कुठेही आणि केव्हाही फडकवू शकतात. परंतु त्यांनी राष्ट्रध्वजाच्या संहितेचे काटेकोरपणं पालन करावं आणि तिरंग्याच्या वैभवात कोणतीही हानी होऊ देऊ नये.

हेही  वाचा – २०० कोटीच्या ‘मन्नत’ बंगल्याचा मालक आज सलमान खान असता, पण…

देशातील सर्वात उंच तिरंगा कुठं फडकतो?

  • बेळगाव, कर्नाटक- ३६०.८ फूट
  • अटारी बॉर्डर – ३६० फूट
  • कोल्हापूर, महाराष्ट्र – ३०३ फूट
  • पहाडी मंदिर, रांची – २९३ फूट
  • तेलीबंध, रायपूर – २६९ फूट
  • फरीदाबाद – २५० फूट
  • भोपाळ – २३७ फूट
  • कॅनॉट प्लेस, दिल्ली – २०७ फूट
  • जयपूर – २०६ फूट
Leave a comment