हातात तिरंगा अन् मनात अभिमान..! आनंद महिंद्रांनी शेअर केला ‘खास’ PHOTO; पाहा!

WhatsApp Group

Har Ghar Tiranga : १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिन जवळ आला आहे. पुढील आठवड्यात सोमवारी संपूर्ण देश स्वातंत्र्याचा ७५वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. सरकार जवळपास वर्षभरापासून ‘आझादी का अमृत महोत्सव’ देशभरात साजरा करत आहे. ‘हर घर तिरंगा’ मोहीम यशस्वी करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला केलं आहे. दरम्यान उद्योगपती आनंद महिंद्राही तिरंग्याच्या रंगात रंगलेले दिसले. त्यांनी फोटोसह केलेल्या पोस्टचे लोक कौतुकही करत आहेत.

महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय

आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. विशेषतः ट्विटर ते रोज होणाऱ्या घडामोडींबाबत सतर्क असतात. ट्विटरवर अनेकदा त्याच्या पोस्ट व्हायरल होतात आणि हजारो युझर्सचं लक्ष वेधून घेतात. कधीकधी ते त्यांच्या कॉर्पोरेट हाऊसची जाहिरात देखील करतात. खेळातील त्याच्या प्रचंड आवडीमुळं, त्याची टाइमलाइन देखील याच विषयाशी संबंधित पोस्टनी भरलेली आहे. आता त्यांनी ‘हर घर तिरंगा’ मोहीम आणि ‘आझादी का अमृत महोत्सव’ची आठवण काढली आहे.

हेही वाचा – ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत भाग घ्यायचाय? घरबसल्या मिळेल सर्टिफिकेट; ‘असं’ करा डाऊनलोड!

टपाल खात्याला म्हटलं ‘देश की धड़कन’

आनंद महिंद्रा यांना मुंबईच्या पोस्टमास्टर जनरल यांच्याकडून राष्ट्रध्वज भेट म्हणून मिळाला आहे. त्यांचा फोटो शेअर करत महिंद्रा यांनी लिहिलं, ”हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत स्वाती पांडे, पोस्टमास्टर जनरल, मुंबई यांच्याकडून ‘तिरंगा’ स्वीकारल्याबद्दल धन्य वाटत आहे. आमच्या टपाल खात्याचा झेंडा उंच ठेवणाऱ्या स्वाती यांचे आभार. आपलं टपाल खातं ‘देश की धड़कन’ आहे.”

हेही वाचा – ‘दादा’गिरीला पुन्हा सुरुवात..! सौरव गांगुली क्रिकेटच्या मैदानात; करणार भारतीय संघाचं नेतृत्व!

आनंद महिंद्रा यांच्या या फोटोचं सोशल मीडिया युझर्स कौतुक करत आहेत. एक दिवस आधी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर त्यांनी आपल्या बहिणीसोबतचा एक जुना फोटो शेअर केला होता. त्यांना लहानपणीचे दिवस आठवले. आपल्या आई आणि बहिणीसोबतचा बालपणीचा फोटो शेअर करत महिंद्रा यांनी लिहिलं, ”माझ्या संग्रहातील रक्षाबंधनाच्या सर्वात जुन्या फोटोंपैकी एक. हा फोटो दिल्लीचा आहे, ज्यामध्ये माझ्यासोबत माझी बहीण राधिका आणि माझी आई आहे. माझी धाकटी बहीण अनुजा हिचं अभिनंदन, जी सध्या कोडागु इथं आहे, पण तिची राखी वेळेवर आली आहे. काही परंपरा कधीच संपत नाहीत.” आनंद महिंद्रा परंपरांना जपत आहेत, हे पाहून नेटतऱ्यांनीही त्यांचे कौतुक केलं आहे.

Leave a comment