Gujarat Morbi Bridge Collapse : ‘असा’ पडला गुजरातचा केबल ब्रिज..! पाहा CCTV फुटेज

WhatsApp Group

Gujarat Morbi Bridge Collapse : गुजरातमधील मोरबी येथील पूल दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. पुलावर लोक सेल्फी काढताना आणि मस्ती करताना दिसत आहेत. काही जण पूल हलवताना दिसतात. मग काही सेकंदात पूल कोसळतो आणि काही क्षणातच लोक नदीत पडतात. ३५ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये पुलावर खूप गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. पूल अतिशय अरुंद आहे. हा पूल अचानक तुटल्याने शेकडो लोक त्यात पडतात.

मोरबी येथे रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. येथे मच्छू नदीवर बांधलेला केबल पूल अचानक तुटून नदीत पडला. अपघाताच्या वेळी पुलावर ३००-४०० लोक उपस्थित होते. काही जणांनी पुलाला आणि दोरीला लटकून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही लोकांनी पोहत नदीतून बाहेर पडले. तर शेकडो लोक नदीत बुडाले.

हेही वाचा – Twitter वर ब्लू टिकसाठी द्यावे लागतील ‘इतके’ पैसे..! प्रत्येक महिन्याला करा खर्च

या अपघातात १४१ जणांचा मृत्यू

गुजरातमधील मोरबी येथील पूल दुर्घटनेत आतापर्यंत १४१ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या १५ तासांपासून बचावकार्य सुरू आहे. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स एनडीआरएफ, फायर ब्रिगेड, एसडीआरएफचे पथक बचावकार्यात गुंतले आहेत. आतापर्यंत १७७ जणांची सुटका करण्यात आली आहे. या पुलाचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. कंपनीविरुद्ध कलम ३०४, ३०८ आणि ११४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment