Gujarat Morbi Bridge Collapse : दुर्घटनेनंतर पहिली ‘मोठी’ कारवाई; ‘या’ कंपनीच्या ९ लोकांना ठोकल्या बेड्या!

WhatsApp Group

Gujarat Morbi Bridge Collapse : गुजरातमधील मोरबी जिल्ह्यात मच्छू नदीवरील १४३ वर्षे जुना पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात आतापर्यंत १३४ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. त्याचवेळी या घटनेबाबत कारवाई करत प्रशासनाने दोन कंत्राटदारांसह ओरेवा कंपनीच्या ९ जणांना अटक केली आहे. या सर्व ९ जणांना अटक करण्यापूर्वी ताब्यात घेण्यात आले होते. दुसरीकडे रविवारीच प्रशासनाने निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघाताबाबत गुन्हा दाखल केला होता.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ओरेवाचे २ व्यवस्थापक, २ तिकीट क्लर्क, ३ सुरक्षा रक्षक आणि २ दुरुस्ती करणारे कंत्राटदार यांचा समावेश आहे. या ९ आरोपींना पकडण्यासाठी गुजरात एटीएस, राज्य गुप्तचर विभाग आणि

हेही वाचा – Video : “निवडणूकीच्या शेवटच्या क्षणी ही घटना…”, गुजरात पूल दुर्घटनेनंतर PM मोदींचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत!

अटक करण्यापूर्वी, पोलिसांनी गुजरातमधील मोरबी शहरातील केबल ब्रिजची देखभाल आणि ऑपरेशन पाहणाऱ्या एजन्सींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मोरबी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीपसिंह झाला यांनी रविवारी पत्रकारांना सांगितले की, शहरातील घड्याळे आणि ई-बाईक बनवणाऱ्या ओरेवा ग्रुपला पुलाचे नूतनीकरण आणि कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. मोरबीचे पोलीस अधीक्षक (एसपी) राहुल त्रिपाठी यांनी सांगितले की, रविवारी रात्री एफआयआर नोंदवल्यानंतर काही लोकांना प्राथमिक चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment